PM Modi Rajya Sabha Speech: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेनंतर आज राज्यसभेतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या काळातील विकास आणि भाजपच्या काळातील विकासचा मुद्दा मांडला. तुम्ही अनेक दशके सत्ताधारी पक्षात बसलात, आता अनेक दशके विरोधी पक्षात बसण्याचा तुमचा संकल्प जनता नक्कीच पूर्ण करेल, अशी टीका मोदींनी यावेळी केली.
सरकारी कंपन्यांबाबत अफवा पसरवल्या, आज LIC चे शेअर्स विक्रमी पातळीवर; मोदींचा पलटवार
पीएम मोदी पुढे म्हणाले की, चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी त्यांची मते मांडली आणि त्यांच्या पद्धतीने चर्चा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सर्व आदरणीय सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे विशेष आभार मानतो. मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होतो. त्यांना इतकावेळ बोलण्याचे स्वातंत्र्य कसे मिळाले, असा प्रश्न मला पडला. त्या दिवशी दोन खास कमांडर नव्हते, त्यामुळे खरगेजींनी पुरेपूर फायदा घेतला. खरगेजी चौकार आणि षटकार मारत होते. त्यांनी आपल्या भाषणात एनडीएला 400 जागांचा आशीर्वाद दिला, असा टोमणाही मोदींनी यावेळी लगावला.
पीएम मोदी पुढे म्हणतात, जुन्या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. या आवाजाला देशातील जनतेने बळ दिले आहे. काँग्रेसने सत्तेसाठी लोकशाहीचा गळा दाबला. काँग्रेसने लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारांना बरखास्त केले. काँग्रेसने देशाच्या संविधानाला बंदीस्त केले, काँग्रेसने वृत्तपत्रांवर टाळे लावले, काँग्रेसने तेव्हा देशाला तोडले आणि आता उत्तर-दक्षिण तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे काँग्रेस आम्हाला लोकशाही शिकवत आहे.
“मोदी की गॅरंटी का दौर हैं...”; PM मोदींचा राज्यसभेत वाचून दाखवली कविता, काँग्रेसवर टीका
काँग्रेसने भाषेच्या नावार देशाला वाटले, काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी दहशतवादाला खतपाणी घातले, त्यांनी नॉर्थ इस्टमध्ये कट्टरावाद आणि मागासलेपणा वाढू दिला, काँग्रेसने आपल्या देशाची जमीन शत्रु देशाला दिली, सैन्याचे आधुनिककरण रोखले आमि हे काँग्रेस आम्हाला देशाच्या सुरक्षेबद्दल प्रवच देत आहे. काँग्रेस स्वातंत्र्यानंतर अनेक दशके गोंधळात होती. काँग्रेसच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देश 12 नंबरवरुन 11 नंबरवर आला आणि आमच्या दहा वर्षात 11 नंबरवरुन 5 नंबरवर आला. हीच काँग्रेस आमहाला आर्थिकनितीवर भाषण देत आहे.
बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याची काँग्रेसची तयारी नव्हती; राज्यसभेतून मोदींचा घणाघात
काँग्रेसने ओबीसीला आरक्षण दिले नाही, यांनी सामान्य वर्गातील कुटुंबाना आरक्षण दिले नाही. बाबासाहेब आंबेडकर नसते, तर दलितांना आरक्षण मिळाले नसते. याच काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न न देता आपल्या कुटुंबातील सदस्यांना देत राहिला. भाजपच्या मदतीने सरकार सत्तेत आल्यानंतर बाबासाहेबांना भारतरत्न दिला गेला. त्यांनी रस्त्या-रस्त्यांना आपल्या कुटुंबाची नावे दिली. या काँग्रेस नेत्यांची गॅरंटी राहिली नाही, पक्षाची गॅरंटी राहिली नाही आणि हे मोदीच्या गॅरंटीबद्दल बोलत आहेत. त्यांच्या कार्यकाळात देश नाराज झाला. देशाला इतका राग का आला, हे आमच्यामुळे झाले नाही, तर त्यांच्या स्वतःच्या कर्माची फळे त्यांना मिळाली. आम्ही देशाला अडचणीतून बाहेर आणले, म्हणूनच देश आम्हाला आशीर्वाद देतोय, असंही मोदी यावेळी म्हणाले.