PM Modi Jammu Kashmir Visit:जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर सूमारे पाच वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी J&K च्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी राज्यात 6400 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ केला. तसेच, बक्षी स्टेडियममध्ये विकसित भारताच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी नाझीम नावाच्या लाभार्थ्याशी बोलत असताना नाझीमने पीएम मोदींसोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. मोदींनीही त्या तरुणाची इच्छा पूर्ण केली आणि सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली.
नाझीमने पीएम मोदींना सेल्फीसाठी विचारले, तेव्हा पंतप्रधानांनी आपल्या एसपीजी टीमला त्या तरुणाला जवळ आणण्यास सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर फोटो शेअर करत पीएम मोदी म्हणाले, “माझा मित्र नाझीमसोबतचा एक संस्मरणीय सेल्फी. त्याच्या चांगल्या कामाने मी प्रभावित झालो. जाहीर सभेत त्याने सेल्फीची विनंती केली आणि त्याला भेटून मलाही आनंद झाला. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”
नाझीमच्या बोलण्याने पंतप्रधान इंप्रेसविकसित भारताचा लाभार्थी नाझीम याने पीएम मोदींसोबत आपल्या कामाचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, “मी मधमाशांपासून मध काढण्याचे काम करतो. मी 5 हजार किलो मध विकला आहे. याचा फायदा फक्त मी एकट्याने घेतला नाही, तर माझ्यासोबत इतर तरुणांनाही सामील करून घेतले. हळूहळू जवळपास 100 लोक माझ्या कामात सामील झाले. आम्हाला 2023 मध्ये FPO मिळाला आणि त्यानंतर सर्व चिंता दूर झाल्या. आम्हीही देशासोबत पुढे जात आहोत." हे ऐकून पीएम मोदी खुप इम्प्रेस झाले. त्यामुळे त्यांनी नाझिमसोबतची सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली.
संबंधित बातमी- काही राजकीय घराणे कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचे; PM मोदींचा घणाघात