5 राज्यांत 'या' तारखेला होऊ शकते विधानसभा निवडणुकीची घोषणा; मोदींच्या विधानानंतर चर्चांना उधान
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 22, 2021 04:27 PM2021-02-22T16:27:30+5:302021-02-22T16:28:31+5:30
खरेतर आतापर्यंत निवडणूक तारखांची घोषणा निवडणूक आयोगच करत आला आहे. त्यामुळे मोदींच्या या अंदाजाने राजकीय चर्चांना हवा दिली आहे. (PM Narendra Modi)
दिसपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (सोमवार) आसाम आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. या दोन्ही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वप्रथम मोदी आसाम येथे गेले. त्यांनी येथे धेमाजीच्या सिलपाथरमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले, मार्चच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) घोषणा होऊ शकते. खरेतर आतापर्यंत निवडणूक तारखांची घोषणा निवडणूक आयोगच करत आला आहे. त्यामुळे मोदींच्या या अंदाजाने राजकीय चर्चांना हवा दिली आहे. (PM Narendra Modi on Assam Visit says treatment of Assam as a stepchild by previous governments)
काँग्रेसच्या हाती आला मोठ्ठा भोपळा; मोदी-शहांचा आणखी एक जोरदार दणका
मोदी म्हणाले, ‘मला माहीत आहे, आता तुम्ही निवडणुकीची वाट पाहत असाल, गेल्या वेळी शक्यतो 4 मार्चला निवडणुकीची घोषणा झाली होती. त्यामुळे, यावेळीही मार्चच्या पहल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होईल, असे वाटते. हे काम निवडणूक आयोगाचे आहे, ते करतील. मात्र, निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी जेवढ्या वेळा शक्य होईल, तेवढ्या वेळा आसामला (Assam) येण्याचा, पश्चिम बंगालला (West Bengal) जाण्याचा, केरळ (Kerala), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि पुदुच्चेरीला (Puducherry) जाण्याचा माझा प्रयत्न असेल.
2 मार्चपर्यंत मोदींचा निवडणूक होणाऱ्या 5 राज्यात दौरा फिक्स -
पंतप्रधान मोदी 2 मार्चपर्यंत लवकरच निवडणूक होणाऱ्या 5 राज्याचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. अथवा पायाभरणी करतील. पंतप्रधान 27 फेब्रुवारीला केरल, 28 फेब्रुवारीला पश्चिम बंगाल, 1 मार्चला तामिळनाडु आणि 2 मार्च आसामचा दौरा करतील. यानंतर 7 मार्चला ते कोलकात्यातील ब्रिगेड ग्राउंडवर होणाऱ्या पक्षाच्या मोठ्या जनसभेला संबोधित करतील. याच दिवशी पश्चिम बंगालमधील भाजपच्या पाचही परिवर्तन यात्रांचा समारोपही होणार आहे.
मोदी-शाहंच्या 'खेळी'मुळे काँग्रेसचा 'खेळ खल्लास'; किरण बेदींना हटवलं, पुडुचेरी सरकार पाडलं!
आसाममध्ये या योजनांचे अद्घाटन अथवा पायाभरणी -
मोदींनी आसाममधील बोगाईगावात इंडियन ऑईलची इंडमॅक्स (INDMAX) युनिट, दिब्रूगडमधील मधुबन येथे ऑइल इंडिया लिमिटेडची सहायक टँक फार्म आणि तिनसुकियातील हेबेडा गावात गॅस कंप्रेसर स्टेशनचे लोकार्पण केले. पंतप्रधानांनी धेमाजी इंजिनिअरिंग कॉलेजचेही उद्घाटन केले. याच बरोबर, सुआलकुची इंजिनिअरिंग कॉलेजची पायाभरणीही केली.
धोरण योग्य असेल, हेतू स्पष्ट असेल तर, नशीबही बदलतं: पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील सरकारांकडून आसामला सावत्रपणाची वागणूक -
आसामच्या विकासाचा आधार येथील इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मात्र, आधीच्या सरकारांनी नॉर्थ बँकेसोबत सावत्र असल्यासारखा व्यवराहार केला. "सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास"या आधारावर काम करणाऱ्या आमच्या सरकारने भेदभाव दूर केला,' असेही मोदी म्हणाले.