नवी दिल्ली :पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) 'जनऔषधी दिवस'निमित्ताने देशातील ७ हजार ५०० व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण केले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी काही लाभार्थ्यांशी संवादही साधला. मेड इन इंडिया लस भारतासाठी आणि जगासाठीही असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना केला. (pm narendra modi dedicate 7500th janaushadhi kendra to the nation)
पैसे नाही, म्हणून कोणीही औषधांपासून वंचित राहू नये, यासाठी जनऔषधी केंद्रांची सुरुवात करण्यात आली. जनऔषधी दिवसाच्या निमित्ताने देशाला ७ हजार ५०० वे जनऔषधी केंद्र समर्पित करताना आनंद होत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली होती.
ठरलं! PM मोदींच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती करणार भाषण; सौरव गांगुलीबद्दल सस्पेंस कायम
जगासाठी भारत औषधाचे केंद्र
कोरोना संकटाशी लढण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीसाठी शास्त्रज्ञ काम करत होते. मात्र, भारतात लस निर्मिती झाल्याने आपण जगासाठी औषधाचे केंद्र बनले आहोत. मेड इन इंडिया कोरोना लस केवळ भारतीयांसाठी नाही, तर ती जगासाठीही आहे. जागतिक स्तरावर सर्वांत स्वस्त कोरोना लस भारतातून पुरवली जात आहे. खासगी रुग्णालयात कोरोना लसीची किंमत केवळ २५० रुपये आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
देशवासी एक कुटुंब, एक परिवार
संपूर्ण देश मला माझ्या परिवारासारखा आहे. तुम्ही आजारी असाल, तर माझे कुटुंबीय आजारी आहे, असे मला वाटते. म्हणून आरोग्य आणि औषधांच्या अधिकाधिक उत्तमोत्तम सोयी, सुविधा आपल्याला देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. जनऔषधी केंद्रांमधून गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मदत मिळत आहे. जनऔषधी केंद्रांमुळे सामान्य कुटुंबांची प्रतिवर्ष ५० हजार कोटी रुपयांची बचत होत असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.