मोदींनी सांगितला पुण्यातल्या रिक्षावाल्याचा किस्सा; समाजवाद्यांना मारला टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 02:10 PM2019-04-24T14:10:02+5:302019-04-24T14:12:46+5:30

मी जे सांगत आहे ते कुणाचीही टिंगल किंवा टीका-टिपण्णी करण्याचा उद्देश नाही.

PM Narendra modi express incident of pune Auto driver in enterview of Akshay kumar | मोदींनी सांगितला पुण्यातल्या रिक्षावाल्याचा किस्सा; समाजवाद्यांना मारला टोमणा

मोदींनी सांगितला पुण्यातल्या रिक्षावाल्याचा किस्सा; समाजवाद्यांना मारला टोमणा

Next

मुंबई - बॉलिवूडचा इंटरनॅशनल खिलाडी अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. या मुलाखतीवेळी अक्षयने मोदींच्या खासगी जीवनाविषयकही अनेक प्रश्नांची विचारणा केली. त्यावेळी, पंतप्रधान मोदींनी पुण्यातील रिक्षावाल्याचा एक किस्साही सांगितला. पुण्यातील समाजवादी लोक स्वत:ला साधं, गरीब आणि सरळमार्गी दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोदींनी म्हटलं. 

मी जे सांगत आहे ते कुणाचीही टिंगल किंवा टीका-टिपण्णी करण्याचा उद्देश नाही. पण, माझ्या जीवनात घडलेला हा प्रसंग असून खूप जुनी आठवण आहे ही. मी तेव्हा हाफ कुर्ता, पायजमा, पायात बूट, खांद्यावर पिशवी आणि चेहऱ्यावर दाढी अशा पोषाखात फिरत असे. एकदा मी पुण्यातील रेल्वे स्थानकावर उतरलो. हातात एक वर्तमानपत्र आणि खांद्यावर पिशवी अकडवून मी पुण्यातील आरएसएसच्या शाखेकडे निघालो होतो. मी चालतच निघालो होतो, तेव्हा एक रिक्षावाला माझ्यासोबत हळुहळू रिक्षा चालवत होता. मी 100 ते 200 मीटर पुढे चालत आलो, तरीही रिक्षावाला माझ्यासोबतच. त्यामुळे मी त्याला विचारला, भाई आपकी ऑटो मे कुछ प्रॉब्लम है क्या..? त्यावर तो म्हणाला तुम्ही रिक्षात नाही का बसणार ? मी उत्तरलो.. नाही मी तर चालत चाललो आहे. त्यांतर रिक्षावाल्यानं विचारलं, तुम्ही समजवादी आहात का ?. तर, मी म्हटलं नाही, मी अहमदाबादी आहे. पण, तुम्ही मला समाजवादी असं का विचारलं ?. त्यावर, रिक्षावाला म्हणाला पुण्यातील समाजवादी लोकं सर्वसामान्य लोकांसमोर रिक्षात बसत नाहीत. तर पुढे गेल्यानंतर गपचूप रिक्षात बसतात.

 पंतप्रधान मोदींचा हा किस्सा अक्षय कुमारला तितका न समल्यामुळे अक्षयने असं का ? असा प्रश्न मोदींना विचारला. त्यावर, मोदींनी अक्षयला समाजवादी माणूस म्हणजे काय हे समजावून सांगितलं. समाजवादी लोक हे स्वत:ला गरीब, साधं दाखविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे माझा अवतार पाहून रिक्षावाल्याने मला समाजवादी का, असा प्रश्न केला. पण, मी अहमदाबादी असल्याचं सांगितलं, हा घडलेला प्रसंग मोदींनी आपल्या खासगी आयुष्यासंदर्भात दिलेल्या मुलाखती अक्षय कुमारला सांगितला. 

दरम्यान, अक्षय कुमारने दोन दिवसांपूर्वी एक ट्विट करुन खळबळ उडवून दिली होती. काहीतरी नवीन करतोय, असे म्हणत अक्षय कुमारे राजकीय प्रवेशाकडे लक्ष वेधलं होतं. मात्र, त्यानंतर अक्षयनेच मी राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे म्हटले. तर, आज सकाळी पंतप्रधान मोदींची मुलाखत घेऊन सर्वांनाचा आश्चर्याच धक्का दिला आहे.   
 

Web Title: PM Narendra modi express incident of pune Auto driver in enterview of Akshay kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.