पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उत्तर प्रदेशमध्ये महोबा येथे एलपीजी कनेक्शन (LPG connection) देऊन उज्ज्वला 2.0 (पंतप्रधान उज्ज्वला योजना) शुभारंभ करणार आहेत. कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala 2.0) लाभार्थ्यांसोबत चर्चा करणार आहेत. (The beneficiaries of Ujjwala 2.0 will not only get deposit-free LPG connection but also free of cost first refill and hotplate.)
2016 मध्ये उज्ज्वला 1.0 योजना लाँच करण्यात आली होती. बीपीएल परिवारात ५ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यानंतर योजनेच्या विस्तारात 2018 मध्ये सात आणि श्रेणींमध्ये (एससी/एसटी सारख्या) 8 कोटींचे वाढीव लक्ष्य ठेवण्यात आले होते. हे टार्गेट सात महिन्यांआधीच ऑगस्ट 2019 मध्ये पूर्ण करण्यात आले होते.
आर्थिक वर्ष 21-22 च्या बजेटमध्ये पीएमयूवाय स्कीमनुसार एक कोटी अतिरिक्त एलपीजी कनेक्शन देण्याची तरतूद करण्यात आली होती. एक कोटी अतिरिक्त पीएमयूवाय कनेक्शन (उज्ज्वला 2.0) द्वारे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाला एलपीजी कनेक्शन देणे हा उद्देश आहे. ज्यांना पहिल्या योजनेत देता आले नव्हते.
उज्ज्वला 2.0 लाभार्थ्यांना डिपॉझिट फ्री एलपीजी कनेक्शन सोबत पहिली रिफिल आणि हॉटप्लेट मोफत देण्यात येणार आहे. सोबतच कमीतकमी कागदपत्र लागणार आहेत. उज्ज्वला 2.0 च्या लोकांना रेशन कार्ड किंवा अॅड्रेस प्रूफ जमा करावा लागणार आहे. ही योजना लाँच करताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील हजर राहतील. (PM Narendra Modi to launch Ujjwala Yojana 2.0 on August 10)