PM Narendra Modi : जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी सर्वात पुढे; बायडेन, बोरिस जॉन्सन यांना टाकलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 10:54 PM2021-11-06T22:54:07+5:302021-11-06T22:54:26+5:30
PM Narendra Modi most admired leader : अन्य देशातील नेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी याची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचं आलं समोर.
PM Narendra Modi most admired leader : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशातच नाही, तर परदेशातही सर्वाधिक आहे. अप्रुव्हल रेटिंग एजन्सीच्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील अनेक बड्या नेत्यांना मागे टाकलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden), ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही त्यांनी मागे टाकलं आहे.
मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अप्रुव्हल रेटिंग हे सर्वाधिक म्हणजेच ७० टक्के इतरं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेज ओबराडोर (६६ टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर इटलीचे पंतप्रधान पारियो द्रागी (५८ टक्के) यांचा क्रमांक आहे. जर्मनीच्या चॅन्सलर एन्जेला मार्केल (५४ टक्के) या पाचव्या स्थानावर, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (४४ टक्के) हे सहाव्या स्थानावर आहेत.
रेटिंगमध्ये कोणाला कितवं स्थान?
1.नरेंद्र मोदी: ७० टक्के
2. लोपेज ओबराडोर : ६६ टक्के
3. मारियो द्रागी : ५८ टक्के
4. एन्जेला मार्केल: ५४ टक्के
5. स्कॉट मॉरिसन: ४७ टक्के
6. जो बायडेन: ४४ टक्के
7. जस्टिन ट्रूडो: ४३ टक्के
8. फुमियो किशिदा: ४२ टक्के
9. मून जे-इन: ४१ टक्के
10. बोरिस जॉन्सन: ४० टक्के
11. पेड्रो सांचेज: ३७ टक्के
12. इमॅन्युअल मॅक्रोन: ३६ टक्के
13. जायर बोल्सोनारो: ३५ टक्के
Global Leader Approval: Among All Adults https://t.co/dQsNxouZWb
— Morning Consult (@MorningConsult) November 5, 2021
Modi: 70%
López Obrador: 66%
Draghi: 58%
Merkel: 54%
Morrison: 47%
Biden: 44%
Trudeau: 43%
Kishida: 42%
Moon: 41%
Johnson: 40%
Sánchez: 37%
Macron: 36%
Bolsonaro: 35%
*Updated 11/4/21 pic.twitter.com/PJYfAAkzFo
मॉर्निंग कन्सल्टद्वारे प्रौढांच्या मुलाखतीद्वारे हे रेटिंग दिलं जातं. मॉर्निंग कन्सल्टनं भारतात यासाठी २१२६ जणांची मुलाखत घेतली. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म मॉर्निग कन्सल्टनं ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, मॅक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युके आणि अमेरिकेच्या बड्या नेत्याचं रेटिंग ट्रॅक केलं आहे.