PM Narendra Modi most admired leader : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशातच नाही, तर परदेशातही सर्वाधिक आहे. अप्रुव्हल रेटिंग एजन्सीच्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील अनेक बड्या नेत्यांना मागे टाकलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden), ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही त्यांनी मागे टाकलं आहे.
मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अप्रुव्हल रेटिंग हे सर्वाधिक म्हणजेच ७० टक्के इतरं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेज ओबराडोर (६६ टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर इटलीचे पंतप्रधान पारियो द्रागी (५८ टक्के) यांचा क्रमांक आहे. जर्मनीच्या चॅन्सलर एन्जेला मार्केल (५४ टक्के) या पाचव्या स्थानावर, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (४४ टक्के) हे सहाव्या स्थानावर आहेत.
रेटिंगमध्ये कोणाला कितवं स्थान?1.नरेंद्र मोदी: ७० टक्के2. लोपेज ओबराडोर : ६६ टक्के3. मारियो द्रागी : ५८ टक्के4. एन्जेला मार्केल: ५४ टक्के5. स्कॉट मॉरिसन: ४७ टक्के6. जो बायडेन: ४४ टक्के7. जस्टिन ट्रूडो: ४३ टक्के8. फुमियो किशिदा: ४२ टक्के9. मून जे-इन: ४१ टक्के10. बोरिस जॉन्सन: ४० टक्के11. पेड्रो सांचेज: ३७ टक्के12. इमॅन्युअल मॅक्रोन: ३६ टक्के13. जायर बोल्सोनारो: ३५ टक्के