नवी दिल्ली : सर्व अधिकार काढून घेऊन रजेवर पाठविलेले ‘सीबीआय’चे विशेष संचालक यांच्याविरुद्ध दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याची फिर्याद नोंदविणारे हैदराबादचे व्यापारी सतीश साना यांना तेथील पोलिसांनी संरक्षण द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.साना यांच्या फिर्यादीवरूनच अस्थाना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अस्थाना व ‘सीबीआय’चे रजेवर पाठविलेले संचालक आलोक वर्मा यांच्यातील उघड संघर्षाचे ते मूळ आहे.‘सीबीआय’च्या क्र. १ व २ च्या अधिकाऱ्यांमधील संघर्षात आपण नाहक बळीचा बकरा ठरत असून आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, अशी याचिका साना यांनी केली होती. त्यावर सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. उदय उमेश लळित व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.बदली रद्द कराया अर्जात बस्सी यांनी प्रामुख्याने अस्थाना यांच्याविरुद्धचा तपास ठिसूळ करण्यासाठी आपली अंदमानला बदली केल्याचा आरोप केला असून ही बदली रद्द करण्याची विनंती केली आहे.
अस्थाना यांच्याविरुद्धच्या फिर्यादीस पोलीस संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 5:01 AM