भाजपा नेता असल्याचं सांगताच, पोलीस अधिकारी म्हणाला.... 'मग तर अजून मारणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 10:48 AM2018-12-31T10:48:36+5:302018-12-31T10:50:03+5:30

शनिवारी रात्री या बांधकामाच्या उभारणीवरुन शेजाऱ्यांशी वाद झाला. त्यावेळी, अज्जू यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

policeman beat bjp leader in panki kanpur issue of local building construction | भाजपा नेता असल्याचं सांगताच, पोलीस अधिकारी म्हणाला.... 'मग तर अजून मारणार'

भाजपा नेता असल्याचं सांगताच, पोलीस अधिकारी म्हणाला.... 'मग तर अजून मारणार'

Next

कानपूर - येथील पनकी इंडस्ट्रीयल परिसरातील कॅनॉलच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्यावरुन शनिवारी रात्री दोन गटांत वाद सुरू झाला. त्यावेळी पनकी इंडस्ट्रीयल विभागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, स्थानिक भाजपा नेत्याने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्याने या भाजापा नेत्याला मारहाण केली. 

दबौली येथील अजय पाल अज्जू हे भाजपाच्या ओबीसी प्रवर्गाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. पनकी इंडस्ट्रीयल परिसरात अज्जू यांच्या एका मित्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी रात्री या बांधकामाच्या उभारणीवरुन शेजाऱ्यांशी वाद झाला. त्यावेळी, अज्जू यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तर, प्रभारी पोलीस अधिकारी अशोक वर्मा हेही तिथे पोहोचले. त्यावेळी भाजपा नेते अज्जू आणि पोलीस अधिकारी वर्मा यांच्यात शाब्दीक वाद झाला. त्यानंतर मी भाजापाचा नेता असल्याचे अज्जू यांनी पोलीस अधिकाऱ्यास सांगितले. त्यावर, पोलिसांकडून शिवीगाळ करण्यात आली. तसेच भाजपा नेता आहे, मग तर तुला मारहाण करणारचं, असा रोखही पोलिस अधिकाऱ्याने बोलून दाखवला. विशेष म्हणजे, अज्जू यांना लॉकअपमध्ये बंदी केले. रविवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच, शेकडो भाजपा कार्यकर्ता पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांच्या हुकमशाहीला आम्ही कदापी सहन करणार नाही, अशी घोषणाबाजी करत भाजपा कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. 

दरम्यान, कल्याणपूर सीओ राजेश कुमार पांडेय आणि एसएसपी अनंत कुमार यांनी प्रभारी पोलीस अधिकारी अलोक वर्मा यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच भाजपा कार्यकर्ते शांत झाले. तसेच अलोक वर्मा हजर झाल्यानंतरच, भाजपा कार्यकर्ते पोलीस ठाण्यातून निघून गेले. 
 

Web Title: policeman beat bjp leader in panki kanpur issue of local building construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.