Nitish Kumar: युपीतील वचपा बिहारमध्ये काढला! भाजपाने पोटनिवडणुकीत मित्रपक्षाविरोधात उमेदवार दिला; सारे आलबेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 08:17 AM2022-03-19T08:17:09+5:302022-03-19T08:21:28+5:30

बिहारमध्ये विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यापैकी बोचहां मतदारसंघातून भाजपाने माजी आमदार बेबी कुमारी यांना उमेदवार बनविले आहे. भाजपाची यादी प्रसिद्ध होताच, या मतदारसंघात भाजपा उमेदवाराचे नाव दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Politics: In Bihar, BJP fielded a candidate against the Allies; All is good in the Nitish Kumar government? | Nitish Kumar: युपीतील वचपा बिहारमध्ये काढला! भाजपाने पोटनिवडणुकीत मित्रपक्षाविरोधात उमेदवार दिला; सारे आलबेल?

Nitish Kumar: युपीतील वचपा बिहारमध्ये काढला! भाजपाने पोटनिवडणुकीत मित्रपक्षाविरोधात उमेदवार दिला; सारे आलबेल?

Next

शेजारच्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने अस्वस्थ झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपासोबत थेट वैर घेण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भर विधानसभेतच अध्यक्षांवर तुम्ही अशाप्रकारे कामकाज चालवू शकत नाही, असे सुनावले. यामुळे दुसऱ्या दिवशी अध्यक्ष आलेच नाहीत. या साऱ्या प्रकारामुळे नितीशकुमार आणि भाजपातील असंतोष आता उफाळून येण्याची चिन्हे असताना भाजपाने पोटनिवडणुकीत आपला उमेदवार दिल्याने आणखीनच दरी वाढली आहे. 

बिहारमध्ये विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यापैकी बोचहां मतदारसंघातून भाजपाने माजी आमदार बेबी कुमारी यांना उमेदवार बनविले आहे. भाजपाची यादी प्रसिद्ध होताच, या मतदारसंघात भाजपा उमेदवाराचे नाव दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आमदाराचा मृत्यू झाल्यास ती जागा तिथे जिंकलेल्या मित्रपक्षालाच दिली जाते. परंतू भाजपाने असे न करता आपला उमेदवार उतरविला आहे. 

भाजपने उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यानंतर विकासशील इंसान पार्टी आणि नितीश कुमार सरकारमधील मंत्री मुकेश साहनी यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपच्या या पावलावर ते पुढे काय निर्णय घेणार, याची प्रतीक्षा आहे.
2020 च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा विकासशील इन्सान पक्षाच्या पासवान यांनी जिंकली होती. नुकतेच त्यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. मुकेश साहनी यांनी आधीच जाहीर केले आहे की, ही त्यांची जागा आहे, त्यामुळे ते या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. यासाठी त्यांनी मुसाफिर पासवान यांचा मुलगा अमर पासवान याच्या नावाचीही घोषणा केली आहे.

आता अशा स्थितीत भाजपने उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानंतर मुकेश साहनी  मागे हटले नाहीत, तर एनडीए आघाडीतील दोन घटक पक्षांमध्येच लढत होणार आहे. आरजेडीने उमेदवार उभे केल्याने ही लढत तिरंगी होणार आहे.
यूपी निवडणुकीत मुकेश साहनी यांनी भाजपविरोधात ५३ जागांवर निवडणूक लढवली होती. त्याचवेळी बिहारमध्ये 24 जागांवर एमएलसी निवडणुकाही होणार आहेत आणि या निवडणुकीसाठी मुकेश साहनी यांच्या पक्षाने 7 जागांवर भाजपविरोधातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
 

Web Title: Politics: In Bihar, BJP fielded a candidate against the Allies; All is good in the Nitish Kumar government?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.