मशीदीमध्ये नमाज पठण इस्लामनुसार योग्य की अयोग्य? शुक्रवारी ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 02:46 PM2018-09-24T14:46:03+5:302018-09-24T14:47:01+5:30
हे प्रकरण अयोध्या-बाबरी मशीदीशी संबंधित असून सर्वोच्च न्यायालयाने 20 जुलैरोजी हा या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.
नवी दिल्ली : मशीदींमध्ये नमाज पठण इस्लामनुसार कायदेशीर आहे की बेकायदेशीर याबाबतचा निर्णय येत्या 28 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण अयोध्या-बाबरी मशीदीशी संबंधित असून सर्वोच्च न्यायालयाने 20 जुलैरोजी हा या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.
संविधान पीठाने 1994 मध्ये मशीदीमध्ये नमाज पठण करणे इस्लामचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. या निर्णया विरोधात काही संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत एक समिती अभ्यास करत होती. यावेळी न्यायालयाने आधी संविधान पीठाच्या निर्णयावर विचार करावा की न करावा याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. या निर्णयानंतर मूळ याचिकेवर निर्णय देण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने 1994 मध्ये इस्माईल फारुकी प्रकरणी राम जन्मभूमीमध्ये जैसे-थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते कारण हिंदू तेथे पूजा करू शकतील. तसेच मशीदीमध्ये नमाज पठण करणे हा इस्लामचा भाग नसून नमाज कुठेही, म्हणजे मोकळ्या मैदानातही पठण केला जाऊ शकतो, असे म्हटले होते.