नगरपालिका अन् पंचायत समितीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदीचं 'क्लिअर' ट्विट

By महेश गलांडे | Published: March 2, 2021 07:55 PM2021-03-02T19:55:33+5:302021-03-02T19:55:47+5:30

गुजरातमधील निवडणूक झालेल्या ३१ जिल्हा परिषदांपैकी सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांवर भाजपाचे कमल उमलले आहे. तर पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्येही भाजपाने निर्विवाद यश मिळवले आहे

Prime Minister Modi's 'clear' tweet after the results of Nagarpalika and Panchayat Samiti | नगरपालिका अन् पंचायत समितीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदीचं 'क्लिअर' ट्विट

नगरपालिका अन् पंचायत समितीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदीचं 'क्लिअर' ट्विट

Next
ठळक मुद्देगुजरातमधील निवडणूक झालेल्या ३१ जिल्हा परिषदांपैकी सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांवर भाजपाचे कमल उमलले आहे. तर पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्येही भाजपाने निर्विवाद यश मिळवले आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यागुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने (BJP) एकतर्फी विजय मिळवून सहा महानगरपालिकांवर मोठ्या बहुमतासह कब्जा केला होता. त्यानंतर आता आठवडाभराने झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. 

गुजरातमधील निवडणूक झालेल्या ३१ जिल्हा परिषदांपैकी सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांवर भाजपाचे कमल उमलले आहे. तर पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्येही भाजपाने निर्विवाद यश मिळवले आहे. (BJP's resounding victory in all 31 Zilla Parishads in Gujarat) तर, नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपाने ७७ नगरपालिकांमध्ये कमळ खुलवलंय. त्यानंतर, मोदींनी ट्विट करुन गुजरातच्या जनतेचं अभिनंदन आणि आभार व्यक्त केलंय. 

गुजरातच्या ग्रामीण भागाने सर्वसंमतीने विकासावर शिक्कामोर्तब केलंय. सरकारच्या जनहितार्थ कामाने लोकांच्या मनात घर केलंय, तर दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. आमचा पक्ष गुजरातमधील सर्व बंधु-भगिनींच्या प्रगतीसाठी काम करत राहिल. गुजरातमधील नगरपालिका, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निकालाने आपला स्पष्ट संदेश दिला आहे. भाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी गुजरातच्या जनतेला नमन करतो, असे ट्विट मोदींनी केलंय. 

गुजरातमधील मतदान झालेल्या ३१ जिल्हा परिषदांच्या मतमोजणीत भाजपाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. अखेरीच सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांमध्ये भाजपाने बहुमताचा दिशेने आगेकूच केली. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला एकाही जिल्ह्यात सत्ता मिळवता आली नाही. तर २३१ पंचायत समित्यांपैकी १९६ पंचायस समित्यांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. तर ३३ पंचायत समित्यांवर काँग्रेसने कब्जा केला आहे. नगरपालिकांच्या निकालांमध्येही भाजपाचाचा बोलबाला दिसून आला. ८१ पैकी ७७ नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता मिळवली. तर काँग्रेसला ४ नगरपालिकांमध्ये विजय मिळाला. दरम्यान, काँग्रेसचा दारुण पराभव होत असताना आपने मात्र गुजरातच्या ग्रामीण भागांमध्येही प्रवेश करण्यात यश मिळवला आहे. काही ठिकाणी आपचे उमेदवार विजयी झाले होते. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात लागलेल्या गुजरातमधील सहा मोठ्या शहरातील महानगरपालिकांमध्ये भाजपाने निर्विवाद यश मिळवले होते. अहमदाबाद, बडोदा, सूरत, राजकोट, जामनगर आणि भावनगरमधील महानगरपालिकांमध्ये भाजपाने बाजी मारली होती. 

Web Title: Prime Minister Modi's 'clear' tweet after the results of Nagarpalika and Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.