नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी द्वारका येथील डीडीए ग्राऊंडवर आयोजित दसऱ्याच्या कार्यक्रमात रावण पुतळ्याचं दहन केलं. विजयादशमीच्या दिवशी वाईटावर मात करुन आपल्यामधील रावण संपवून टाका, तेव्हाच हा सण साजरा करण्यात अर्थ आहे. तसेच महिलांना सन्मान द्या, प्लास्टिक बंदी यशस्वी होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
भारत हा उत्सवांचा देश आहे, वर्षातील एकही दिवस असा नसणार की, त्यादिवशी कोणताही सण साजरा केला जात नाही. उत्सव आपल्या सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम करतो तसेच तोडण्याचं कामही होतं. उत्सवामुळे नवीन नवीन स्वप्नांत रंग भरण्याचं सामार्थ्य निर्माण होतं. उत्सव आपल्या सामाजिक जीवनातील प्राण आहे. उत्सावामुळे अनेक कला विविध विविध माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. या भारतीय परंपरेला कोणीही रोबोट तयार करत नाही तर जिवंत माणसं ही परंपरा जन्मला घालतात.
महिलांचा सन्मान देवीचा जप करुन साधना प्राप्त करणारा देश प्रत्येक आई आणि मुलीचा सन्मान, गौरव आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेणं हा संकल्प हवा. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करतो ते सर्वांचे स्वप्न असतं. पण देशातील प्रत्येक घरात, गावामध्ये, परिसरामध्ये, शहरांमध्ये मुलीच्या रुपाने लक्ष्मी असते त्यांना त्यांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रेरणा द्यायला हवी. सामूहिक कार्यक्रमात त्यांचे सन्मानित करणे हीच लक्ष्मी पूजा आहे.
देशाची संपत्ती वाचविण्याचा संकल्पपंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सांगितले की, देशातील जनतेने देशाची संपत्ती वाचविण्याचा संकल्प करावं आवाहन करतो. मी जर पाणी वाचवू शकतो तर तो संकल्प आहे, मी जेवणाच्या ताटात कोणतंही अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेईन, वीज वाचविणे हा संकल्प, देशाची संपत्तीला कोणतंही नुकसान होणार नाही हा संकल्प ठेवू शकतो. राम सेतूचं उदाहरण देत सामूहिक शक्ती एकत्र आल्याचं महत्व पटवून देत आपणही एकत्र येऊन संकल्प पूर्ण करण्याचं ध्येय गाठूया असं आवाहन त्यांनी केलं.