पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध

By admin | Published: July 10, 2017 11:18 PM2017-07-10T23:18:13+5:302017-07-10T23:18:13+5:30

अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या

Prime Minister Narendra Modi organized a protest against the Amarnath yatra | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० -  अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांप्रति संवेदना व्यक्त करताना पंतप्रधानांनी अशा भ्याड हल्ल्यांमुळे भारत झुकणार नसल्याचे सांगितले.
अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्याचा ट्विटरवरून निषेध नोंवताना मोदी म्हणाले,"अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. या हल्ल्यात मुत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो. तर जखमी झालेल्यांची प्रकृती सुधरावी यासाठी प्रार्थना करतो."
"भारत अशा भ्याड हल्ल्यासमोर कधीही झुकणार नाही. मी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच पुरेपूर मदतीचे आश्वासन  दिले आहे." 
जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजवणाऱ्या दहशतवाद्यांनी आज अमरनाथ यात्रेकरूंना आपले लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून, १३ जण जखमी झाले आहेत. मृत यात्रेकरू हे गुजरातमधील वलसाड येथील राहणारे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बालटाल येथून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सात भाविक ठार झाले असून, १३ जण जखमी झाले आहे. दहशतवाद्यांनी रात्री आठच्या सुमारास हा हल्ला केला. यात्रेकरूंनी बस थांबवल्याने ही बस सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातून मागे राहिली. ही संधी साधत दहशतवाद्यांनी हल्ला केला.
  हल्ल्याची शिकार झालेली बस गुजरातमधील वलसाड येथील असल्याचे समोर आले आहे. तसेच मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांशी चर्चा केली आहे. तसेच या हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  तसेच या घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. 

Web Title: Prime Minister Narendra Modi organized a protest against the Amarnath yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.