पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले, iCreate मधील i का लहान ठेवण्यात आला...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 05:33 PM2018-01-17T17:33:51+5:302018-01-17T17:40:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून यांच्यासोबत गुजरातमधील धोलेरा गावात आयक्रिएट (iCreate) सेंटरचे बुधवारी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी iCreate मधील आय (i) हे अक्षर लहान का ठेवण्यात आले आहे, यासंदर्भात माहितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून यांच्यासोबत गुजरातमधील धोलेरा गावात आयक्रिएट (iCreate) सेंटरचे बुधवारी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी iCreate मधील आय (i) हे अक्षर लहान का ठेवण्यात आले आहे, यासंदर्भात माहितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आय (i) चे मोठे होणे क्रिएटिव्हिटीमध्ये अडथळा आणणारे होते. त्यामुळे iCreate मधील i हा लहान करण्यात आला आहे. तसचे, यामध्ये जर आय (i) मोठा असता तर यामध्ये महत्वाचा असा अहंकार आडवा आला असता. यामुळे सुरुवातीपासूनच लहान आय करुन मोठी स्वप्ने पाहिली आहेत.
iCreate का जो आई है, वो स्मॉल लेटर में हैं। जब iCreate का नाम तय हो रहा था, तो आई को हमने छोटा क्यों रखा, इसके पीछे भी एक वजह थी। साथियों, क्रिएटिविटी की सबसे बड़ी रुकावट होती है आई का बड़ा होना: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 17, 2018
दरम्यान, iCreate सेंटरचे उद्घाटन करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून आणि त्यांची पत्नी अहमदाबादला आले. यावेळी त्यांनी अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंत रोड शोदेखील केला. विमानतळ ते साबरमती आश्रम यादरम्यान 8 कि.मी.च्या अंतरात हा रोड शो करण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदी, इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांची पत्नी यांनी साबरमती आश्रमाला देखील भेट दिली. यापूर्वी गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यासोबतही रोड शो केला होता.
आज आवश्यकता है कि हमारे युवा देश के सामने खड़ी समस्याओं से मुक्ति के लिए innovate करें | सामान्य व्यक्ति की quality of life को कम से कम खर्च में कैसे improve किया जा सकता है, इसके लिए innovate करें : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 17, 2018
ताज महालला दिली भेट
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पत्नी सारा यांच्यासह मंगळवारी (16 जानेवारी) ताजमहालला भेट दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी स्थानिक कलाकारांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. नेतन्याहू यांच्या ताज भेटीच्या पार्श्वभूमीवर सामान्य पर्यटकांसाठी ताजमहलचा प्रवेश दोन तास बंद होता.
समुद्राचे पाणी शुद्ध करणारी मशीन भेट
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू हे मोदी यांना एक जीप भेट देणार आहेत. यामध्ये समुद्राचे पाणी शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान आहे. ही जीप भारतात दाखल झाली आहे. आता ही जीप गुजरातमध्ये भूज येथे पाठविण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी शुद्ध करण्याचा हा प्रयोग दोन्ही देशांचे पंतप्रधान १७ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दाखविणार आहेत. या जीपची किंमत १,११,००० डॉलर आहे.