मुंबई - केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटदेखील केले आहे. काळ्या पैशाविरोधातील मोहीमेला साथ दिल्याबद्दल जनतेचे आभार, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दरम्यान, नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी 8 नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले आहे, तर सत्ताधारी भाजपाने काळा पैसाविरोधी दिन म्हणून तो साजरा करण्याचे ठरवले आहे. या वर्षपूर्तीच्या आदल्या दिवशी मंगळवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीवर पुन्हा कडाडून टीका केली, तर नोटाबंदीचे जोरदार समर्थन करताना, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या निर्णयामुळे प्रचंड बेहिशेबी पैसा बँकांमध्ये जमा झाला, त्याला चेहरा मिळाला, असा दावा केला.
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला काँग्रेस-भाजपा आमनेसामने
लोकांनी १५.४४ लाख कोटी रुपयांच्या बाद नोटा नावागावासकट सर्व माहिती देत बँकांमध्ये जमा केल्याने चलनातील बहुतांश पैशाला आता चेहरामोहरा मिळाला आहे. हा पैसा आता निनावी रहिलेला नाही. त्याआधी लोकांकडे खासगी व निनावी स्वरूपात असलेला हा पैसा आता अधिकृतपणे व्यवस्थेत आला आहे. - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्रीनोटाबंदीचे उद्दिष्ट सफल : गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजीजे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता, ते साध्य झाले आहे. त्यामुळे हा दिवस अर्थव्यवस्थेच्या इतिहासात क्रांतिकारक म्हणून स्मरणात राहील, असा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी केला.जेटली यांनी लिहिले आहे की, याचे फायदे दिसत नसले तरी भारत पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ, पारदर्शी व प्रामाणिक वित्तीय व्यवस्था असलेला देश झाला आहे. भावी पिढीला प्रामाणिक व्यवस्थेत आयुष्य घडविण्याची संधी मिळाल्याने ही पिढी नोव्हेंबर २०१६ मधील या आर्थिक घटनेकडे अभिमानाने पाहील.निर्णय ठरला पूर्ण घातकीअहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जबरदस्तीने लादलेले नोटाबंदी आणि ‘जीएसटी’ हे निर्णय देशाच्या दृष्टीने पूर्णपणे विनाशकारी ठरले आहेत आणि त्यामुळे छोट्या उद्योग-व्यवसायांचे कंबरडे पार मोडून गेले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी येथे केली.
नोटाबंदीच्या निर्णयाचा ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेस देशभर ‘काळा दिवस’ म्हणून पाळणार आहे. त्या अनुषंगाने येथील सरदार पटेल राष्ट्रीय स्मारकात व्यापारी आणि उद्योजकांच्या एका मेळाव्यात स्वत: नामवंत अर्थतज्ज्ञ असलेले डॉ. सिंग म्हणाले की, नोटाबंदीमुळे देशाच्या आयातीत एक वर्षात २३ टक्के एवढी न भूतो अशी वाढ झाली आणि यात चीनकडून आयातीतील वाढ मोठी होती.रोख चलनाचा वापर कमी करणे हा नोटाबंदीचा प्रमुख उद्देश होता. रोख रकमा काळ्या पैशासाठी पोषक असतात. काळ्या पैशास आळा घालण्यासाठी रोख चलनाचा वापर कमी करणे गरजेचे होते. - अरुण जेटली‘बुलेट ट्रेन’बद्दल शंका घेणा-यांना देशद्रोही ठरवायचे. नोटाबंदी व ‘जीएसटी’वर टीका केली की त्याची करबुडवे म्हणून हेटाळणी करायची ही सत्ताधारी पक्षाची वृत्ती लोकशाहीला मारक आहे. - डॉ. मनमोहन सिंग
अशी झाली नोटाबंदी - 8 नोव्हेंबर : काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी चलनातून पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. बँक खात्यांतून 4, तर एटीएममधून 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंधने. जुन्या नोटा पेट्रोल पंप, सरकारी इस्पितळे, टोल आदी निवडक ठिकाणी 12 नोव्हेंबरपर्यंतच चालू शकणार. बँका आणि पोस्ट ऑफिसेसमध्ये जुन्या नोटा बदलून घेता येणार. बँका एक दिवस, तर एटीएम दोन दिवस बंद.
10 नोव्हेंबर : नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांचा पहिला दिवस. 500 आणि 1000 च्या नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर प्रचंड रांगा.
11 नोव्हेंबर : जुन्या नोटा भरण्यासाठी नागरिकांनी बँकांत प्रचंड गर्दी केली होती. एकट्या स्टेट बँकेत 53 हजार कोटी रुपये जमा झाले. आणखी तीन दिवस टोल फ्री प्रवासाची मुदत वाढवून देण्यात आली.
12 नोव्हेंबर : सुट्टीच्या दिवशी शनिवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या असल्या, तरीही गर्दी कायम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 30 डिसेंबरनंतर पुन्हा एकदा काळ्या पैसेवाल्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा इशारा.
13 नोव्हेंबर : बँक खात्यांतून पैसे काढण्याची मर्यादा 4 हजार 500 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. एटीएममधून 2 हजार 500 रुपयांपर्यंत मर्यादेत वाढ. दुसर्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यावर 30 डिसेंबरपर्यंत कोणतेही शुल्क आकारणार नसल्याची घोषणा.
14 नोव्हेंबर : वीज बिल, पाणी बिल, पेट्रोल-डिझेल खरेदी, दूध केंद्रे, मेट्रो-रेल्वे तिकिटे, सार्वजनिक वाहतूक, घरफाळा, न्यायालयीन शुल्क, केंद्रीय भांडार, गॅस सिलिंडर या ठिकाणी जुन्या नोटा चालणार असल्याचे जाहीर करत सरकारने नागरिकांना दिलासा दिला.
15 नोव्हेंबर : जुन्या नोटा बदलून घेणार्यांच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय. तेच-तेच लोक नोटा बदलून घेत असल्याने गर्दी कमी करण्यासाठी उपाय. निवडणूक आयोगाकडून नाराजी.