नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर; शेतकऱ्यांसाठी करणार मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 10:01 AM2020-01-02T10:01:21+5:302020-01-02T10:16:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर असणार आहेत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदीकर्नाटकामधील तुमकुरमध्ये श्री सिध्दगंगा मठमधील श्रीश्री शिवकुमार स्वामींच्या स्मारक संग्रालयाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमकुरुमध्ये सभा घेणार असून या सभेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता (डिसेंबर 2019 ते मार्च 2020)चा शुभारंभ करणार आहेत. तसेच कर्नाटकला कृषि कर्मण पुरस्कार देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कर्यक्रमावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरपा आणि श्री सिद्धलिंगेश्वर स्वामी देखील उपस्थित राहणार आहे.
Prime Minister Narendra Modi will be participating in various programmes in Karnataka, today. The first programme will be a visit to Sree Siddaganga Mutt in Tumakuru. pic.twitter.com/dqzE9OdU5f
— ANI (@ANI) January 2, 2020
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनूसार (पीएमओ) किसान सन्मान निधी योजनेचा तिसऱ्या हप्त्याचा लाभ देशातील सहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार असून एकूण 12 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यातील 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप आला नसल्यानं नव्या वर्षात उरलेल्या रकमेसह खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे.