प्रियंका मैदानात?

By admin | Published: May 28, 2016 04:52 AM2016-05-28T04:52:58+5:302016-05-28T04:52:58+5:30

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसतर्फे जूनच्या मध्यावर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. या घोषणेबरोबरच तिथे काँग्रेसच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाईल.

Priyanka on the field? | प्रियंका मैदानात?

प्रियंका मैदानात?

Next

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसतर्फे जूनच्या मध्यावर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. या घोषणेबरोबरच तिथे काँग्रेसच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाईल. प्रियंका गांधींच्या आगमनाची ही घोषणा असेल काय? याचा खुलासा करण्याचे पक्षाच्या सूत्रांनी सावधपणे टाळले असले तरी मंगळवारी पक्षाचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या अलाहाबाद येथील बैठकीत, प्रियंका गांधींकडेच उत्तर प्रदेशच्या प्रचाराची सारी सूत्रे सोपवण्यात यावीत, या मागणीचा नेत्यांनी जोरदार पुरस्कार केल्याचे समजते.
प्रशांत किशोर यांनी आसाममध्ये ज्या दोन प्रादेशिक पक्षांशी समझोता करण्याचा सल्ला काँग्रेसला दिला होता. त्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. त्याच दोन पक्षांशी आघाडी करून भाजपाने आसाम जिंकले. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोरांच्या सल्ल्याचे महत्त्व काँग्रेसमध्ये वाढले आहे.

- आसाम व केरळची सत्ता काँग्रेसने गमावल्यानंतर प्रियंका यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

प्रशांत किशोर उत्तर प्रदेशात अ‍ॅक्टिव्ह ...
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग व प्रशांत किशोर यांच्यात मतभेद झाले अशा बातम्या मध्यंतरी पसरल्या. त्यानंतर किशोर यांनी निवडणुकीची रणनीती ठरवावी. पक्षाच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये, असा सूर काही नेत्यांनी लावला.
पत्रकारांशी बोलताना प्रवक्ते शकील अहमद यांनीही त्याला दुजोरा दिला होता. आसामच्या निकालानंतर काँग्रेसमधील किशोरविरोधकांचा आवाज क्षीण झाला आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पीकेंच्या
सल्ल्यानुसारच पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी अमरिंदरसिंग यांच्या नावाची घोषणा होणार आहे.
संघटनेतील बदलांबाबत प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी ते जूनपासून २0 दिवस उत्तर प्रदेशात तर १0 दिवस पंजाबमधे तळ ठोकणार आहेत. त्यांच्या पथकाचे १00 सदस्य सध्या राज्यात ठिकठिकाणी फिरून विविध प्रकारची सविस्तर माहिती गोळा करीत आहेत. उत्तर प्रदेशात आजवर ६0 जिल्ह्यांतील काँग्रेस नेत्यांची किशोर यांनी भेट घेतली. त्यांनी २0१७च्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे नव्या टीमची मागणी केली आहे.
‘बेशिस्त कार्यक र्त्यांच्या भरवशावर पक्ष विजयी होऊ शकत नाही. निवडणुकीत ज्यांना तिकीट हवे असेल, त्यांनी आपल्या मतदारसंघातील प्रभावशाली समर्थकांची यादी व त्यांचे वर्णन सादर करावे, तसेच भाजपा, सप व बसपच्या संभाव्य उमेदवारांच्या तुलनेत काँग्रेसमध्ये मतदारसंघात कोणती कमतरता आहे, याचे तपशीलही लेखी स्वरूपात सादर करावेत,’ असा सूचक सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला आहे.

Web Title: Priyanka on the field?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.