शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

Priyanka Gandhi UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये 'महिलाराज'चे संकेत! काँग्रेसच्या पहिल्या यादीतील नावे पाहून भाजपाला घाम फुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 12:24 PM

Priyanka Gandhi UP Election 2022 Congress : प्रियंका गांधींनी जाहीर केली युपी निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर, १२५ पैकी ५० महिलाच.

Priyanka Gandhi UP Election 2022 Congress :  उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी (UP Elections 2022) काँग्रेसने पहिली यादी (Congress First List) जाहीर केली आहे. काँग्रेसच्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत ५० महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. या महिलांमध्ये काँग्रेसकडून यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईलाही उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान त्या त्यांची लढाई लढू शकतील, त्यामुळे त्यांना तिकिट देण्यात आल्याचं प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) म्हणाल्या.

काँग्रेसनं उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी १२५ उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. १२५ उमेदवारांमध्ये ५० महिला उमेदवारांना काँग्रेसनं संधी दिली आहे. "आमच्या १२५ उमेदवारांच्या यादीमध्ये ४० टक्के महिला आणि ४० टक्के तरुणवर्ग आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे आणि आम्हाला राज्यात नव्या राजकारणाची सुरूवात करायची आहे," असं प्रियंका गांधी म्हणाल्या. आमच्या यादीत ज्या महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यापैकी काही पत्रकार आहेत, काही संघर्ष करत असलेल्या महिला, सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्यांना खुप अत्याचार सहन करावे लागले अशा महिलांचाही समावेश असल्याचं त्या म्हणाल्या. आम्हाला अत्याचार सहन करणाऱ्यांचा आवाज बनायचं असल्याचं सांगत उन्नाव पीडितेच्या आईलाही उमेदवारी जाहीर केली. त्या आपल्या संघर्ष पुढेही सुरू ठेवतील, ज्यांच्या मुलीसोबत अत्याचार झाला, त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यात आलं, तिच सत्ता त्यांना मिळावी म्हणून त्यांना संधी दिल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या.सीएए-एनसीआरमधील आंदोलकालाही संधीCAA-NRC विरोधात आंदोलनात सहभागी असलेल्या सदफ जाफरचाही पक्षाच्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. सदफ जाफरने CAA-NRC दरम्यान खूप संघर्ष केला होता. पोस्टरमध्ये त्यांचा फोटो छापून सरकारने त्याला त्रास दिला. माझा संदेश आहे की तुमच्यावर अत्याचार होत असतील तर तुमच्या हक्कासाठी लढा. काँग्रेस अशा महिलांच्या पाठीशी आहे, असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस