'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:02 PM2020-01-14T12:02:09+5:302020-01-14T12:32:10+5:30

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

priyanka gandhi attacks on bjp government as retail inflation at 5 year high vegetables 60 percent expensive | 'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल

'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Next
ठळक मुद्देमहागाईवरून प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपा सरकारने जनतेचा खिसा कापून त्यांच्या पोटावर लाथ मारली असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.किरकोळ महागाई दरामध्ये मोठी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. किरकोळ महागाई दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या साडेपाच वर्षांतील उच्चांकी आहे. महागाईवरूनप्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपा सरकारने जनतेचा खिसा कापून त्यांच्या पोटावर लाथ मारली असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. ट्विटरवरून त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

प्रियंका गांधी यांनी मंगळवारी (14 जानेवारी) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी वाढत्या महागाईवरून भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. 'भाजीपाला आणि खाण्याच्या पदार्थांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. भाज्या, तेल, डाळ आणि पीठाचे दरही वाढले असल्याने गरिबांनी काय खायचं? मंदीमुळे लोकांना कामही मिळत नाही आहे' असं प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अन्नधान्यापासून दैनंदिन वापरातील वस्तू मोठ्या प्रमाणावर महागल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या मुद्यावरून आज काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपा सरकारवर घणाघाती टीका केली आहे. काही वर्षांपूर्वी 'अबकी बार महंगाई पर वार' म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाढत्या महागाईच्या प्रश्नावर गप्प बसले आहेत, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. महागाईच्या प्रश्नावर मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकार नाकर्ते झाले आहे. देशातील जनता महागाईने होरपळत असताना ना मोदी काही उत्तर देत आहेत, ना भाजपाकडून काही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

गेल्या नोव्हेंबरमध्ये 5.54 टक्के महागाई दर होता. सांख्यिकी कार्यालयामध्ये सोमवारी आकडेवारी जाहीर केली. भाज्यांचे वाढलेले दर विशेषकरून डिसेंबरमध्ये कांद्याच्या दराने गाठलेला 200 चा आकडा महागाई दरावर प्रभाव टाकणारा ठरला आहे. डिसेंबरमध्ये भाज्यांचे दर 60.5 टक्के महाग झाले होते. खाद्यपदार्थांचा महागाई दर वाढून 14.12 टक्के झाला आहे. नोव्हेंबरमध्ये हा दर 10.01 टक्के होता. आरबीआय रेपो रेट ठरविताना किरकोळ महागाई दर विचारात घेते. आरबीआयला हा दर 4 ते 6 टक्क्यांमध्ये हवा असतो. हा दर जुलैमध्येच सहा टक्क्यांच्या वर पोहोचला होता. यामुळे आरबीआय रेपो रेटमध्ये कमी करण्याची शक्यता कमी आहे. आरबीआय 6 फेब्रुवारीला याबाबत घोषणा करणार आहे. गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये 1.35 टक्क्यांची कपात केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या 

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात

दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त करावा, योगगुरू रामदेव बाबांचा सल्ला

ड्रोन वापरता? 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; अन्यथा...

Delhi Elections : 'आप' विरोधात भाजपाचा 500 कोटींचा दावा

'आज के शिवाजी' पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना- शिवसेना

 

Web Title: priyanka gandhi attacks on bjp government as retail inflation at 5 year high vegetables 60 percent expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.