Prophet Muhammad: नुपूर शर्माला मुजाहिदीन गजवातुल हिंद या दहशतवादी संघटनेची धमकी, टेलीग्रामवर जारी केले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 05:57 PM2022-06-07T17:57:35+5:302022-06-07T17:59:26+5:30

Prophet Muhammad: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली.

Prophet Muhammad: Nupur Sharma Threatened by Mujahideen Gajwatul Hind, Poster Released on Telegram | Prophet Muhammad: नुपूर शर्माला मुजाहिदीन गजवातुल हिंद या दहशतवादी संघटनेची धमकी, टेलीग्रामवर जारी केले पोस्टर

Prophet Muhammad: नुपूर शर्माला मुजाहिदीन गजवातुल हिंद या दहशतवादी संघटनेची धमकी, टेलीग्रामवर जारी केले पोस्टर

Next

Prophet Muhammad: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याला सर्वत्र विरोध होत आहे. यातच आता मुजाहिदीन गजवातुल हिंद या दहशतवादी संघटनेने नुपूर शर्मा यांना उघड धमकी दिली आहे. नुपूर यांनी संपूर्ण जगाची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा, असे दहशतवादी संघटनेने म्हटले आहे.

टेलीग्रामवर पोस्टर जारी
नुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला असून त्यांनी जगाची माफी मागावी, अशी धमकी दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावर दिली आहे. मुजाहिदीन गजवतुल हिंद या संघटनेने टेलिग्रामवर धमकीचे पोस्टर जारी केले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक प्रकरणांमध्ये या संघटनेचा हात आहे. याचा मुख्य प्रवक्ता खताब कश्मीरी याचे नाव समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यासह 5 मुलांना काश्मीर पोलिसांनी अटक करून मोठा दहशतवादी कट उघड केला होता. या सर्वांनी चौकशीदरम्यान खताब काश्मिरी हा त्यांचा हँडलर असल्याचे उघड केले होते.

दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्माची सुरक्षा वाढवली आहे
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवली आहे. शर्मा यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार केली होती. नुपूर यांनी एका टीव्ही चर्चेदरम्यान प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: Prophet Muhammad: Nupur Sharma Threatened by Mujahideen Gajwatul Hind, Poster Released on Telegram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.