Pulwama Attack : राजकीय इच्छाशक्ती हवी, गाजर दाखवू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 05:45 AM2019-02-17T05:45:57+5:302019-02-17T05:46:31+5:30
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या.
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!
राजकीय इच्छाशक्ती हवी
दहशतवाद संपवायचा असेल तर प्रथम राजकीय इच्छाशक्ती हवी. आज भारत आणि पाकिस्तान अण्वस्रांनी सज्ज आहेत. पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे काश्मीर यांचे एकीकरण करून मर्यादित स्वायत्तता देता येईल. त्यासाठी आधी तेथील लोकांना स्थैर्याची हमी द्यावी लागेल. मुस्लीम दहशतवादाचा मोठा प्रश्न अफगाणिस्तान आणि इराणमध्येही आहे.
- अॅड. रमाकांत खलप,
माजी केंद्रीय कायदामंत्री
गाजर दाखवू नका
पंतप्रधान नरेंद्र मोदींना एवढच सांगायचंय की तुमचं राजकारण आणि तुमचा विकास तुमच्याकडेच ठेवा आणि पाकिस्तानला आयुष्यभराची अद्दल घडवा. किमान यावेळेस तरी कोणतं गाजर दाखवू नका.
- प्रवीण धुमाळ, पिंपरी चिंचवड, पुणे
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपूर येथे गुरुवारी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे ४२ पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा निषेध सर्वत्र देशात होत आहे.
हा हल्ल्याचा फक्त तिव्र निषेध करून चालणार नाही तर कठोर कार्यवाही झाली पाहिजे.त्याच बरोबर या सर्व देश भारतासोबत या दुःखात त्याच्या सोबत असताना चीन मात्र पाकिस्तान ची बाजू घेत आहे.माझे असे मत आहे भारताने चीन च्या भारतातील गुंतवणूक वर बंदी घालावी.काय होईल जी गोस्ट आज मिळत आहे ती उशीरा मिळेल. पण दहशतवाद आणि दहशतवादि याना पाठबळ देणाऱ्या चागल्या अद्दल घडेल.
नाव:-बादल रमेशराव डकरे
पत्ता:-रा. काजळी पोस्ट देऊरवादा ता चांदुर बाजार जिल्हा अमरावती
मो.९९७५८४४६३८
आईवरी विपत्ती
पेलला भार त्यांनी
निधड्या छातीवरती
झेलला वार त्यांनी
धन्य ही मातृभूमी
तुम्हामुळे वीरांनो
ओशाळलेत वैरी
तुम्हा पुढे वीरांनो
नतमस्तक हा देश
झुकल्या सार्व माना
जिंकण्यास ‘पुलवामा’ -
करण माळी,
उरळ खु, ता. बाळापूर, जि. अकोला
सरफरोशी की तमन्ना
अब हमारे दिल में है
देखना है, जोर कितना
बाजू - ए - कातिल में है
- रश्मी बाळासो नदाफ, उदगाव, शिरोळ, जि. कोल्हापूर.