Pulwama Terror Attack : जवानांनी बदला घेतला; 'जैश'च्या दोन कमांडर्ससह 6 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 11:02 AM2019-02-18T11:02:30+5:302019-02-18T11:47:01+5:30

Pulwama Terror Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाइंड व 'जैश-ए-मोहम्मद'चा कमांडर कामरान आणि कमांडर अब्दुल रशीद गाझीला जवानांनी कंठस्नान घातले आहे.

Pulwama Terror Attack : mastermind Jaish-e-Mohammed terrorist Kamran killed | Pulwama Terror Attack : जवानांनी बदला घेतला; 'जैश'च्या दोन कमांडर्ससह 6 दहशतवाद्यांचा खात्मा

Pulwama Terror Attack : जवानांनी बदला घेतला; 'जैश'च्या दोन कमांडर्ससह 6 दहशतवाद्यांचा खात्मा

ठळक मुद्देपुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा खात्माजैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी आणि कमांडर कामरान ठारपुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील पिंगलान चकमकीमध्ये जवानांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 'जैश-ए-मोहम्मद'च्या दोन कमांडर्ससहीत सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.  ज्या घरामध्ये दहशतवादी लपून बसले होते, ते घरच जवानांनी स्फोटकांनी उडवले. मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे (Pulwama Terror Attack )मास्टरमाइंड व 'जैश-ए-मोहम्मद'चा कमांडर कामरान आणि कमांडर अब्दुल रशीद गाझीला जवानांनी कंठस्नान घातले आहे. मात्र भारतीय लष्कराकडून अधिकृतरित्या या वृत्तास अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

अब्दुल रशीद गाझी हा पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. पुलवामा हल्ल्यानंतर गाझी आणि कामरान पसार झाले होते. दरम्यान, गाझी हा 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरचा सर्वात जवळील हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे.  
पुलवामातील हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, अशी भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या हल्ल्यानंतर तरी भारताने पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात होती. अखेर हल्ल्याचा बदला घेण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी (18 फेब्रुवारी) 6 दहशतवाद्यांना ठार करून जवानांनी धडाकेबाज कामगिरी केली.

(Pulwama Attack : व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद)



 

कोण आहे अब्दुल रशीद गाझी ?
जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो आयईडी स्फोटांचा एक्स्पर्ट असल्याचेही बोलले जाते. 9 डिसेंबर2018ला तो पाकिस्तानातून काश्मीरमध्ये दाखल झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी संघटनेने काश्मीरमध्ये सुरू केलेल्या कॅम्पमध्ये गाझी हा प्रमुख ट्रेनर होता. तो काश्मीरमध्ये घुसल्याचे कळताच सुरक्षा संस्थांनी अ‍ॅलर्ट जारी केला होता. गाझी हा 'जैश-ए-मोहम्मद'चा तो टॉप ट्रेनर आहे. तो यापूर्वी अफगाणिस्तानातील तालिबानी अतिरेकी संघटनांमध्येही होता. तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालणा-या अतिरेक्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये तो प्रमुख होता आणि नव्याने संघटनेत दाखल झालेल्यांना ट्रेन करण्याची प्रमुख जबाबदारी त्याच्यावरच होती.  

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारीला जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. 

कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे.



 



 



 



Web Title: Pulwama Terror Attack : mastermind Jaish-e-Mohammed terrorist Kamran killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.