पंजाबमध्ये 'आप'ला मोठा धक्का; CM भगवंत मान यांच्या बालेकिल्ल्यातच पक्षाचा दारुण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 03:31 PM2022-06-26T15:31:19+5:302022-06-26T15:31:49+5:30
भगवंत मान यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या संगरूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे सिमरनजीत मान विजयी झाले आहेत.
अमृतसर: पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील संगरूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे सिमरनजीत मान यांनी मोठा विजय मिळवत आप उमेदवाराचा पराभव केला. आपचे नेते भगवंत मान राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणूक झाली.
Punjab | Simranjit Singh Mann of Shiromani Akali Dal (Amritsar) wins Sangrur Lok Sabha bypoll pic.twitter.com/WD2rZMIGDH
— ANI (@ANI) June 26, 2022
शिअदच्या सिमरनजीत मान यांनी आप उमेदवार गुरमेल सिंग यांचा 7000 हून अधिक मतांनी पराभव केला. संगरुर ही जागा भगवंत मान यांचा बालेकिल्ला मानली जाते. अशा स्थितीत येथून पक्षाचा पराभव होणे हा मोठा धक्का मानला जात आहे. या निकालाकडे आता परिवर्तनाची लाट म्हणून पाहिले जात आहे.
कोण आहेत सिमरजनीत मान?
सिमरनजीत सिंह मान (77) हे शिरोमणी अकाली दल (अमृतसर) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 1966 मध्ये केंद्रीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. यानंतर 18 जून 1984 रोजी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला. त्यांचे लग्न गीतंदर कौर मान (पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर यांची बहीण) यांच्याशी झाले आहे. ते 1989 मध्ये तरणतारणमधून आणि त्यानंतर 1999 मध्ये संगरूरमधून खासदार झाले होते.