#AmritsarTrainAccident : हा नियतीचा घाला, दुर्घटनेचं राजकारण नको - नवज्योतसिंग सिद्धू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 10:37 AM2018-10-20T10:37:30+5:302018-10-20T11:01:03+5:30

अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये  रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली.

Punjab Minister Navjot Singh Sidhu visits Civil Hospital in Amritsar where injured have been admitted after the #AmritsarTrainAccident | #AmritsarTrainAccident : हा नियतीचा घाला, दुर्घटनेचं राजकारण नको - नवज्योतसिंग सिद्धू

#AmritsarTrainAccident : हा नियतीचा घाला, दुर्घटनेचं राजकारण नको - नवज्योतसिंग सिद्धू

अमृतसर : अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (19 ऑक्टोबर) रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. रेल्वेचा वेग व उपस्थितांची संख्या बघता, मृतांची संख्या 100वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले



#AmritsarTrainAccident : ... तर दुर्घटना टळली असती; रेल्वे प्रशासनाने केले हात वर!

अमृतसरजवळील जोडा रेल्वेफाटकाजवळ झालेली दुर्घटना ही अत्यंत दुर्देवी आणि दु:खद घटना आहे. ही दुर्घटना म्हणजे नियतीचा घाला आहे. तसेच हा अपघात होता हे सर्वप्रथम आपल्याला समजून घेतले पाहिजे. निश्चित दुर्लक्ष झाले पण हे कोणी जाणीवपूर्वक हेतू किंवा उद्देशाने घडवून आणलेले नाही. या दुर्घटनेचं राजकारण करू नका असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.


#AmritsarTrainAccident : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

गुरु नानक देव रुग्णालयात जाऊन अमृतसर ट्रेन दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू पत्रकारांशी बोलत होते. ट्रेन प्रचंड वेगात येत असताना काही मिनिटात हा अपघात घडला. ट्रेनकडून कुठलाही हॉर्न देण्यात आला नाही. मुख्यमंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले. 

#AmritsarTrainAccident : रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ


#AmritsarTrainAccident : ...आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप

अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण अपघातात 61 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या ठिकाणी बेकायदेशीररीत्या आयोजित करण्यात आलेल्या या रावणदहनाच्या कार्यक्रमाला पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच त्यांच्या पत्नींनी घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. दरम्यान, नवज्योत कौर सिद्धू यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे.


 

Web Title: Punjab Minister Navjot Singh Sidhu visits Civil Hospital in Amritsar where injured have been admitted after the #AmritsarTrainAccident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.