Purvanchal Expressway: विचित्र योगायोगांचा एक्स्प्रेस वे! मायावती हरल्या, अखिलेशने खुर्ची गमावली; आता...?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 03:09 PM2021-11-16T15:09:23+5:302021-11-16T15:19:06+5:30
Purvanchal Expressway Inauguration: भाजपाने पूर्वेकडील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची पुरेपूर तयारी केली आहे. परंतू राजकीय इतिहास काही वेगळीच कहाणी सांगत आहे.
उत्तर प्रदेश आणि एक्स्प्रेस वे एक विचित्र संयोग आहे. पूर्वांचल एक्स्प्रेसवे खूप चर्चेत आहे. या एक्स्प्रेसवेवर 3.4 किमीची हवाई धावपट्टी आकर्षण आहे. नऊ जिल्ह्यांतून हा द्रुतगती महामार्ग जातो. यामुळे उत्तर प्रदेशच्या विकासाला मोठा वेग मिळणार आहे. असे असले तरी उत्तर प्रदेशमधील एक्स्प्रेस वे एक विचित्र योगायोग ठरत आले आहेत. विधानसभा निवडणूकीत सत्ताधारी पुरते घसरले आहेत.
भाजपाने पूर्वेकडील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची पुरेपूर तयारी केली आहे. परंतू राजकीय इतिहास काही वेगळीच कहाणी सांगत आहे. दिल्ली ते बिहारदरम्यान प्रवास करताना उत्तर प्रदेशमध्ये वेगाने वाहतूक व्हावी म्हणून मायावतींनी मुख्यमंत्री असताना एक्स्प्रेस वे बनविण्याची तयारी सुरु केली होती. 2007 मध्ये मायावतींनी पूर्वांचलमध्ये मोठे यश मिळाले होते. यामुळे मोठ्या काळानंतर उत्तर प्रदेशला मजबूत सरकार मिळाले होते.
मायावतींनी आपल्या कार्यकाळात नोएडा ते आग्रापर्यंत यमुना एक्स्प्रेस वेचे निर्माण केले होते. मात्र, त्या या एक्स्प्रेस वेचे उद्गाटन करू शकल्या नाहीत. 2012 मध्ये त्यांची सत्ता गेली. मायावतींनी बनविलेल्या या एक्स्प्रेस वेचे उद्घाटन समाजवादी पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले. यानंतर अखिलेश यांच्या कार्यकाळात आग्रा ते पुढे लखनऊ पर्यंत एक्स्प्रेस वे वाढविण्यात आला. त्यांनी भूमीपूजनच नाही तर विधानसभा निवडणुकीआधी 2016 मध्ये उद्घाटन देखील केले.
परंतू अखिलेश यांची परिस्थिती मायावतींसारखीच झाली. 2017 मध्ये समाजवादी पक्षाची सत्ता गेली. यानंतर आलेल्या योगी सरकारने उत्तर प्रदेशमध्ये एक्स्प्रेस हायवेंचे काम सुरु ठेवले. लखनऊ ते बिहारच्या सीमेवरील गाझीपूरपर्यंत हा नवा एक्स्प्रेस हायवे बनविण्यात आला आहे. अखिलेश म्हणतात की 22 डिसेंबर 2016 ला आम्ही भूमीपूजन केले. तर भाजपा नेते म्हणतात की त्यांनीच काम पूर्ण केले. काहीही असले तरी, एक्स्प्रेस हायवे आणि सत्तांतर हा योगायोग जुळलेला आहे.