इव्हीएमवर शंका घेणाऱ्या काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयात धक्का, याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 05:01 PM2017-12-15T17:01:50+5:302017-12-15T17:06:02+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत इव्हीएमसोबतच VVPAT मशीनमधील मतांची मोजणी करण्याची मागणी करणारी काँग्रेसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Pushing the Congress, who suspected of EVM, in the Supreme Court, rejected the petition | इव्हीएमवर शंका घेणाऱ्या काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयात धक्का, याचिका फेटाळली

इव्हीएमवर शंका घेणाऱ्या काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयात धक्का, याचिका फेटाळली

googlenewsNext

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत इव्हीएमसोबतच VVPAT मशीनमधील मतांची मोजणी करण्याची मागणी करणारी काँग्रेसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गुजरातमधील प्रचारात जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतरही काँग्रेसला गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळण्याबाबत साशंकता आहे. इव्हीएमच्या माध्यमातून आपल्याशी दगाफटका होऊ शकतो असा संशय व्यक्त करत काँग्रेसने इव्हीएमसोबतच 25 टक्के VVPAT मधील चिठ्ठ्यांचीही मतमोजणी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेसने केली होती.  
 गुजरातमधील शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी संपताच विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) अंदाज आले होते. सर्व एक्झिट पोलमधून गुजरातेत भाजपाच पुन्हा एकवार मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल, असे एकमत झाले आहे. गुजरातमध्ये सोमवार, १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले होते दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच राज्यामध्ये घेतलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. त्यांच्या निष्कर्षात भाजपा व काँग्रेस या दोन पक्षांना मिळू शकणा-या जागांबाबत एकमत नसले, तरी गुजरातमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता येईल, यावर या सर्वांमध्ये एकवाक्यता आहे. या अंदाजांनंतर काँग्रेसच्या गोटात धाकधुक वाढली आहे. 
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असल्याने या निवडणुकीत या दोघांची व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लागली होती. विशेषत: सलग १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले मोदी ते पद सोडून पंतप्रधान म्हणून दिल्लीत गेल्यावर त्यांची या राज्यावरील पकड सैल झाली की अधिक बळकट झाली याचा कौल म्हणून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मोदींनीही काहीही झाले तरी गुजरात हातचे जाऊ द्यायचे नाही या पक्क्या इराद्याने पंतप्रधानपदाच्या सर्व जबाबदा-या बाजूला ठेवून प्रचाराचे जातीने नेतृत्व केले. दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा मिळालेले राहुल गांधी यांनीही नव्या दमाने व कल्पकतेने प्रचाराची शिकस्त केली.
सरतेशेवटी दोन्ही बाजूंकडून प्रचाराची पातळी घसरली आणि गुजरातची निवडणूक ही मोदी व राहुल गांधी यांच्यातील व्यक्तिगत लढाई असे चित्र निर्माण झाले. ‘एक्झिट पोल’ हे ब्रह्मवाक्य नाही हे मान्य केले आणि याआधी अनेक एक्झिट पोलचे अंदाज काही वेळा सपशेल चुकलेही आहेत हे गृहीत धरले आणि यंदा आकडे कमी-जास्त झाले तरी त्यातून दिसणारा सत्तेचा अंतिम कौल चुकेल, असे त्यामुळेच वाटत नाही. 

Web Title: Pushing the Congress, who suspected of EVM, in the Supreme Court, rejected the petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.