भांडवलदारांच्या फायद्यासाठीच राफेल करार; राहुल गांधींचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 06:10 AM2018-10-19T06:10:01+5:302018-10-19T06:10:13+5:30

नवी दिल्ली : लबाड भांडवलदारांच्या फायद्यासाठी राफेल लढाऊ विमानांचा खरेदी करार पुन्हा करण्यात आला आणि जगात भारताची प्रतिष्ठा कमी ...

Rafael contract for the benefit of the industrialist; Rahul Gandhi attacks | भांडवलदारांच्या फायद्यासाठीच राफेल करार; राहुल गांधींचा हल्ला

भांडवलदारांच्या फायद्यासाठीच राफेल करार; राहुल गांधींचा हल्ला

Next

नवी दिल्ली : लबाड भांडवलदारांच्या फायद्यासाठी राफेल लढाऊ विमानांचा खरेदी करार पुन्हा करण्यात आला आणि जगात भारताची प्रतिष्ठा कमी झाली, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर हल्ला केला.


फेसबुक पोस्टवर गांधी यांनी म्हटले आहे की, करारासाठी वाटाघाटी पुन्हा करण्यात आल्यामुळे भारताला तंत्रज्ञान हस्तांतर होऊ शकणार नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात भारताला तंत्रज्ञान हस्तांतरण ठरले होते. नवे तंत्रज्ञान भारतात येऊ न शकल्यामुळे पुरातन जग्वार विमाने चालवताना भारतीय विमानचालकांचे जीवित धोक्यात आले आहे ही लाजिरवाणी बाब आहे. १२६ राफेल विमानांसोबत तंत्रज्ञान मिळवण्याऐवजी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने फ्रान्समध्ये बनवलेल्या ३६ विमानांचा खरेदी व्यवहार केला, असा आरोप राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमात आलेल्या वृत्तांच्या आधारे केला. १२६ राफेल विमाने तंत्रज्ञानासह आली असती तर भारतीय हवाई दलात मोठे परिवर्तन घडले असते, असेही गांधी म्हणाले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने वाटाघाटी केलेल्या व्यवहारांना पूर्ण करण्याऐवजी २०१४ पासून मोदी सरकार लबाड भांडवलदारांच्या फायद्यासाठी फेरवाटाघाटी करीत आहे, असे गांधी म्हणाले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने १२६ राफेल विमानांसाठी केलेल्या करारामुळे भारतीय हवाई दलाचा चेहरा बदलला असता.

...तर स्वावलंबी झालो असतो
आधीच्या करारात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचाही समावेश होता. तंत्रज्ञानामुळे भविष्यात आम्ही स्वावलंबी व्हायला मदत झाली असती. हे न करता अनिल अंबानी यांच्या फायद्यासाठी खरेदी व्यवहार पुन्हा केला व फक्त ३६ विमानेच येणार आहेत व ती यायलाही कित्येक वर्षे लागतील, असे या पोस्टमध्ये गांधी यांनी म्हटले.

Web Title: Rafael contract for the benefit of the industrialist; Rahul Gandhi attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.