भ्रष्टाचारावर चौकीदार गप्प का? - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 06:03 PM2018-11-10T18:03:19+5:302018-11-10T18:21:08+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडमधील कांकेर येथे प्रचारसभा घेतली. भ्रष्टाचार, बेरोजगारी यावरुन राहुल गांधींनी सभेत मोदी सरकार आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
रायपूर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी (10 नोव्हेंबर) छत्तीसगडमधील कांकेर येथे प्रचारसभा घेतली. भ्रष्टाचार, बेरोजगारी यावरुन राहुल गांधींनी सभेत मोदी सरकार आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रमण सिंह हे भ्रष्ट मुख्यमंत्री असून त्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणात आले होते. पाकिस्तानमध्ये पनामा पेपर्स प्रकरणात नाव आल्याने पंतप्रधानांनाही तुरुंगात जावे लागले. मात्र छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्या मुलावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचं राहुल यांनी सांगितलं.
If the CM doesn't want to answer that then he should explain to the people of Chhattisgarh why is no action taken against his son, whose name appeared in Panama papers? In Pakistan the PM is jailed because his name appeared in Panama papers: Rahul Gandhi in Kanker #Chhattisgarhpic.twitter.com/syv4uf8oYN
— ANI (@ANI) November 10, 2018
राहुल यांनी पीडीएस घोटाळ्यावरून रमण सिंह यांच्यावर टीका केली. पीडीएस घोटाळ्यातील नोंद वहीत मुख्यमंत्र्यांनी मॅडम आणि डॉक्टर साहेबांना पैसे दिल्याचा उल्लेख होता. हे दोघे कोण आहेत, हे रमण सिंह यांनी जनतेला सांगावे, असे आव्हानच त्यांनी दिले.
2nd is PDS Scam. Rs 36,000 Cr of the people of Chhattisgarh was looted. Diary mili, diary mein likha tha 'CM Madam ko paisa diya. Dr sahab ko paisa diya.' I ask Raman Singh ji who is this CM Madam & Dr sahab whose names were found in the diary in connection with the scam:R Gandhi pic.twitter.com/QoObtfFDza
— ANI (@ANI) November 10, 2018
कांकेरमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ही टीका केली आहे. देशाचे चौकीदार भ्रष्टाचार, बेरोजगारी, नोटाबंदी अशा कोणत्याही विषयावर बोलत नसल्याचही त्यांनी म्हटलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री रमण सिंह यांनी छत्तीसगडमधील तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात स्थानिकांना रोजगार मिळाला नसल्याचीही माहिती दिली. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल असेही राहुल गांधी यांनी सांगितलं.
Modi ji says he's fighting against corruption. But when he comes to Chhattisgarh he doesn't tell you the CM is corrupt. Your Rs 5000 Cr disappeared in chit-fund scam, 310 FIRs were registered but no action was taken because CM was involved: Rahul Gandhi in Kanker #Chhattisgarhpic.twitter.com/kwJOfnTmtJ
— ANI (@ANI) November 10, 2018
Congress President Rahul Gandhi promised all-loan waiver to poor farmers of Chhattisgarh within 10 days of forming the government if voted to power in the state
— ANI Digital (@ani_digital) November 10, 2018
Read @ANI story | https://t.co/YL3i1YK1RFpic.twitter.com/nSXnXM58Uy