हैदराबाद : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला पाठविलेले नव्हते, असे नवे स्पष्टीकरण नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी दिले आणि आधीच्या आपल्या वक्तव्यावरून त्यांनी घूमजाव केले.करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावण्यासाठी सिद्धू पाकिस्तानला गेल्याने वाद निर्माण झाला आहे. पण ‘राहुल गांधी यांनीच आपल्याला पाकिस्तानला जायला सांगितले होते, असा दावा सिद्धू यांनी केला होता. त्यावरून नवा वाद निर्माण होताच, सिद्धू यांनी घूमजाव केले. >राहुल गांधीच कॅप्टनअमरिंदर सिंग हे माजी लष्करी कॅप्टन आहेत. याचा संदर्भ घेऊन सिद्धू यांनी म्हटले होते की, ‘राहुल गांधी हेच माझे ‘कॅप्टन’ आहेत.’ यावरून पंजाबचे कॅबिनेट मंत्री तृप्त राजेंद्र सिंग बजवा यांनी सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बजवा यांनी म्हटले की, सिद्धू हे अमरिंदर यांना कॅप्टन समजत नसतील, तर त्यांनी नैतिक जबाबदारीवर मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा.
राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून पाकिस्तानला गेलो नव्हतो -सिद्धू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 4:51 AM