वायनाड (केरळ) : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी रविवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघाला भेट देत नुकत्याच झालेल्या जंगली हत्तींच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दोन व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.
आपल्या मतदारसंघातील वाढत्या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांसंदर्भात स्थानिकांच्या वाढत्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी शनिवारी रात्री उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये त्यांची भारत जोडो न्याय यात्रा अचानक थांबवून केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात पोहोचले. राहुल गांधी, मृत अजी (४२) याच्या घरी २० मिनिटांपेक्षा जास्त काळ थांबले. गेल्या आठवड्यात वायनाड जिल्ह्यातील मनंथवडी भागात हत्तीने अजीला चिरडून ठार केले होते. अजीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल वनविभागाचे इको-टुरिझम गाईड पॉल यांच्या निवासस्थानी गेले आणि तेथे काही काळ थांबले. इको-टूरिझम गाईड पॉल यांची शुक्रवारी कुरुवा बेटावर जंगली हत्तीने हत्या केली. राहुल दुपारी प्रयागराजला रवाना होण्यापूर्वी कलपेट्टा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर जिल्हा अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत.
म्हणजे बेरोजगारांना दुहेरी तडाखा...
डबल इंजिन' सरकार म्हणजे बेरोजगारांना दुहेरी तडाखा आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केली.
आज उत्तर प्रदेशातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त आहे. जिथे दीड लाखाहून अधिक सरकारी पदे रिक्त आहेत. किमान पात्रतेच्या पदासाठी पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएचडीधारक रांगेत उभे आहेत. भरती होणे हे स्वप्नच आहे, असेही ते म्हणाले.