'पप्पू' नाही, ते तर 'गाढवांचे सम्राट'; भाजपा आमदाराची राहुल गांधींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 12:21 PM2019-03-07T12:21:33+5:302019-03-07T12:27:14+5:30
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतशा वादग्रस्त टीका सुरु झाल्या आहेत.
इंदौर : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतशा वादग्रस्त टीका सुरु झाल्या आहेत. राफेल घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर टीका करताना भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांच्या आमदार मुलाची जीभ घसरली आहे. राहूल गांधी आता पप्पू राहिले नसून गाढवांचे सम्राट झाले आहेत, अशी टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये राफेल डीलची कागदपत्रे चोरीला गेल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करण्याची आणि चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच एअर स्ट्राईकवरूनही त्यांना लक्ष्य केले आहे. यावर भाजपाचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे पूत्र आकाश विजयवर्गीय यांच्या मुलाने टीका केली आहे. आकाश हे मध्य प्रदेशमधील इदौर मतदारसंघाचे आमदार आहेत.
Akash Vijayvargiya,BJP MLA& son of Kailash Vijayvargiya on Rahul Gandhi: Earlier, he was called 'Pappu', that was a harmless&an affectionate name.But of late he has been acting like an anti-national. So we now changed his name from 'Pappu' to 'Gadhon ka Sartaj' #MadhyaPradeshpic.twitter.com/OGxGWS77hT
— ANI (@ANI) March 7, 2019
यापूर्वी राहुल गांधी यांना पप्पू म्हणून ओळखले जात होते. हे नाव हानीकारक नव्हते आणि गोंडस होते. परंतू राहूल आता देश विरोधी असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे नाव बदलत असून पप्पूवरून त्यांना आजपासून 'गधों का सरताज' म्हणून ओळखले जाईल, अशी टीका केली आहे.
खरे पोस्टर बॉय मोदीच
राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन राफेलसंदर्भात आणि राफेलच्या गायब झालेल्या फाईलींबाबत मोदी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी एअर स्ट्राईकसंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यास उत्तर देताना मोदीच पाकिस्तानचे पोस्टर बॉय असल्याचा आरोप राहुल यांनी केला. मी त्या प्रकरणावर जास्त भाष्य करु इच्छित नाही. मात्र, कालच मी बातमी वाचली. त्यामध्ये पुलमावा हल्ल्यातील शहीद सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांनी एअर स्ट्राईकचे पुरावे मागितल्याचं म्हटलं आहे. त्या पीडित कुटुंबीयांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. काँग्रेसनेही त्याबाबत भूमिका घेतली आहे. भाजपाकडून काँग्रेस नेत्यांवर पोस्टर बॉय असल्याचा आरोप करण्यात येत आहे, याबाबतच्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधींनी खरे पोस्टर बॉय मोदीच असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानला तेच गेले होते, त्यांनी गळाभेट घेतली, त्यांनीच नवाझ शरीफ यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं, असे सांगत राहुल गांधींनी एअर स्ट्राईकच्या मुद्द्यावरुन मोदींना लक्ष्य केलं. तसेच याबाबत मी अधिक काहीही बोलू इच्छित नसल्याचंही राहुल यांनी स्पष्ट केलं.