- हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. निमित्त होते पटेल यांच्या मुलीच्या २१ जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या विवाहाच्या निमंत्रणाचे. मात्र त्या दोघांत महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा झाली.गेल्या आठवड्यात पटेल यांनी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली. त्याची माहिती पटेल यांनी गांधी यांना दिली. काँग्रेस व राष्ट्रवादीने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय तत्वत: घेतला असून जागावाटपाला अंतिम स्वरूप दिले जात आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक पक्षांना आघाडीत घेण्याची शरद पवार यांची इच्छा असल्याचे पटेल यांनी गांधी यांना सांगितले. राष्ट्रवादीशी काँग्रेसची युती करण्याची इच्छा सांगण्यासाठी राहुल गांधी यांनी शरद पवार यांची यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.बहुजन विकास आघाडीने (बविआ) पालघरची पोटनिवडणूक लढवली व तिथे काँग्रेसची अनामत रक्कम जप्त झाली. खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान पक्षाने रालोआतून बाहेर पडून आघाडीत प्रवेश केलेला आहे. शेट्टी लोकसभेच्या दोन जागा मागत आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या अन्य गटाल एका जागेसाठी सामावून घेता येईल.काँग्रेस चार जागा सोडण्यास तयार?विरोधी पक्षांच्या हितासाठी काँग्रेस महाराष्ट्रात लोकसभेच्या स्वत:च्या किमान चार जागांवरील हक्क सोडून देऊ शकेल. काँग्रेसने २०१४ मध्ये लोकसभेच्या ४८ पैकी २६ जागा लढविल्या होत्या, परंतु आता प्रादेशिक पक्षांनी ठरावीक भागांत आपला प्रभाव निर्माण केला असून, भाजपाला लढत देण्यासाठी त्यांना सामावून घ्यावे लागेल.
राहुल गांधी-पटेल यांची ऐक्यावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:23 AM