हे तर रणछोड गांधी, शिवराज सिंह यांचा राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 04:49 PM2019-07-07T16:49:34+5:302019-07-07T16:50:06+5:30

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Rahul Gandhi is Rancchod Gandhi - shivraj singh chauhan | हे तर रणछोड गांधी, शिवराज सिंह यांचा राहुल गांधींना टोला

हे तर रणछोड गांधी, शिवराज सिंह यांचा राहुल गांधींना टोला

Next

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कर्नाटकमधील 11 आमदारांना आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने तिथे पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत, काँग्रेसमधील या परिस्थितीवरून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. राहुल गांधी हे रणछोड गांधी बनले आहेत. ते मैदान सोडून पळाले असून, त्यांच्या आमदारांचीही पळापळ सुरू आहे, असे शिवराज सिंह चौहान यांना म्हटले आहे. 

काँग्रेसमध्यी सद्यस्थितीवर भाष्य करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ''काँग्रेसमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. त्यांचे स्वत:चेच लोक पक्ष सोडून पळत आहेत. आता त्यांचे सरकार त्यांच्याच कर्माने कोसळणार असेल तर त्याला आम्ही काय करणार?, कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्याची कुठलीही तयारी आम्ही केलेली नाही. सरकार अल्पमतात आहे हे आम्ही सांगू शकत नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे तर आता रणछोड गांधी बनले आहेत. ते स्वत: मैदान सोडून पळाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या आमदारांचीही पळापळ सुरू आहे. 

 कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील 13 आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्याने आधीपासूनच डामाडौल अवस्थेत असलेले एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. या घडामोडींनी कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आले असून, सरकार वाचविण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची बळकावण्यासाठी भाजपाचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.

शनिवारी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. सर्व 10 आमदार मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसनं या आमदारांशी संपर्क साधू नये, यासाठीही भाजपा प्रयत्नशील आहे. मुंबईत आलेल्या आमदारांमध्ये 7 काँग्रेसचे, तीन जेडीएसचे आहेत. 

Web Title: Rahul Gandhi is Rancchod Gandhi - shivraj singh chauhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.