राहुल गांधींना पुन्हा आली ज्योतिरादित्यांची आठवण; शेअर केला खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 08:50 AM2020-03-12T08:50:05+5:302020-03-12T09:04:08+5:30
खरं तर ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधींच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. ज्योतिरादित्य भाजपामध्ये गेल्यानंतर राहुल गांधींनीही प्रतिक्रिया दिली होती.
नवी दिल्लीः काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. ज्योतिरादित्य शिंदे भाजपामध्ये सहभागी झाल्यानंतर काही तासांतच राहुल गांधींना आपल्या मित्राची पुन्हा एकदा आठवण आली आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो रिट्विट केला आहे. ज्यात राहुल गांधी यांच्याबरोबर ज्योतिरादित्य शिंदे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ दिसत आहेत. राहुल गांधींनी रिट्विट केलेल्या फोटोसोबत एक मजकूरही लिहिला आहे. 'धैर्य आणि वेळ हे दोन शक्तिशाली योद्धे आहेत- लियो टॉल्सटॉय', असा उल्लेख त्या मजकुरात आहे. खरं तर ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधींच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. ज्योतिरादित्य भाजपामध्ये गेल्यानंतर राहुल गांधींनीही प्रतिक्रिया दिली होती.
मध्यप्रदेशमध्ये २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँग्रेस सोडणार नाहीत
माध्यमांनी जेव्हा राहुल गांधींना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारल्यावर याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. राहुल गांधी म्हणाले होते की, मी आणि ज्योतिरादित्य चांगले मित्र आहोत. तसेच आम्ही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. माझ्या घरी कुठल्याही वेळी येऊ शकले अशी एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. दरम्यान, देशाच्या इतिहासात भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला जनादेश आजवर कुणालाही मिळालेला नाही. भारताचं भविष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती सुरक्षित आहे. त्यांनी भारताचं नाव जगात पोहोचवलं आहे. मोदींनी मला देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपाचे आभार मानले होते.The two most powerful warriors are patience and time.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 13, 2018
- Leo Tolstoy pic.twitter.com/MiRq2IlrIg
ठरलं! ज्योतिरादित्य शिंदेंना मिळणार 'हे' मंत्रालय?; मोदींच्या कॅबिनेटमध्ये होणार समावेश
MP Govt Crisis: ज्योतिरादित्य शिंदे राज्यसभेत; मध्य प्रदेशातून उमेदवारी जाहीर
ज्योतिरादित्य शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण...
'मोदींच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित', ज्योतिरादित्य शिंदेंची 'मन की बात'
माझ्या आयुष्यात 2 तारखांना अतिशय महत्त्व आहे, 30 सप्टेंबर 2001 रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले. या दिवसामुळे माझं आयुष्य बदललं. तर, दुसरी तारीख 10 मार्च 2020 जी वडिलांची 75 वी जयंती आहे. ज्यादिवशी मी एक मोठा निर्णय घेतलाय. राजकारण करत असताना, भारत मातेची सेवा करणं हेच उद्देश असायला हवं, तर राजकारण हा त्याच्या उद्देशपूर्तीचा मार्ग असावा. माझ्या वडिलांनी मध्य प्रदेश आणि देशाची सेवा केली. मी काँग्रेस पक्षातून आता भाजपाता काम सुरू करतोय, असे म्हणत काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली. ''काँग्रेस पहिल्यासारखी राहिली नाही. सध्या, जनसेवेचा उद्देश काँग्रेस संघटनेतून पूर्ण होत नाही, असे म्हणत काँग्रेस नेतृत्वावर शिंदेंनी टीका केलीय. 'एक स्वप्न आम्ही पाहिलं होतं, जेव्हा 2018 मध्य प्रदेशमध्ये सरकार बनवलं होतं. पण, 18 महिन्यातंच सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. शेतकरी कर्जमाफी, बोनस, पिकविमा हे देण्यात आम्ही गेल्या 18 महिन्यात असफल ठरलोय, असे म्हणत मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेतृत्वाचं अपयश शिंदे यांनी सांगितलं. तसेच, मोदींचं कौतुक करताना, देशाच्या विकासासाठी मोदींमसमवेत काम करणार असल्याचे शिंदेंनी म्हटले.