इंधन दरावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर निशाणा; त्यांचा संघराज्यवाद सहकारी नव्हे, सक्तीचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 07:44 AM2022-04-29T07:44:52+5:302022-04-29T07:45:09+5:30

इंधनावरील करापैकी ६८ टक्के  हिस्सा  केंद्र सरकार घेते, असे असताना  इंधन दरवाढीचे खापर राज्यांवर फोडून पंतप्रधान आपली जबाबदारी झटकत आहेत.

Rahul Gandhi targets PM over fuel prices | इंधन दरावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर निशाणा; त्यांचा संघराज्यवाद सहकारी नव्हे, सक्तीचा

इंधन दरावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर निशाणा; त्यांचा संघराज्यवाद सहकारी नव्हे, सक्तीचा

Next

नवी दिल्ली : महागलेल्या इंधनावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, मोदी यांचा संघराज्यवाद सहकारी नव्हे तर सक्तीचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना विरोधी पक्ष शासित राज्यांत पेट्रोल-डिझेल खूप महाग असल्याचा मुद्दा उपस्थित करताना या राज्यांना पेट्रोलियम उत्पादनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करुन सामान्य जनतेला दिलासा देण्याचे आणि  या जागतिक संकटात सहकारी संघराज्यवादाच्या भावनेतून काम करण्याची आवाहन केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी  यांनी उपरोक्तपणे परखड टिप्पणी केली. राहुल गांधी यांनी  ट्विटमध्ये आरोप केला की,  इंधनावरील करापैकी ६८ टक्के  हिस्सा  केंद्र सरकार घेते, असे असताना  इंधन दरवाढीचे खापर राज्यांवर फोडून पंतप्रधान आपली जबाबदारी झटकत आहेत. 

हा तर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
इंधन दरवाढीबाबत राज्यांवर ठपका ठेवा. कोळसाटंचाईबाबत राज्यांना दोष द्या. ऑक्सिजन कमतरतेबाबतही राज्यांवर दोषारोप करा.
इंधनावरील करापैकी ६८ टक्के हिस्सा केंद्र सरकार घेते, असे असताना पंतप्रधान जबाबदारी झटकत आहेत. मोदी यांचा संघराज्यवाद सहकारी नाही. तो सक्तीचा आहे, असा आरोपही राहुल गांधी केला.

Web Title: Rahul Gandhi targets PM over fuel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.