न्यूयाँर्क, दि२०- बर्कले विद्यापिठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर टीका केल्यानंतर राहुल गांधी यांनी आता प्रिन्स्टन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी रात्री त्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचे समजते. राहुल गांधी सध्या दोन आठवड्यांच्या अमेरिका दौर्यावर असून या काळात ते विविध विचारवंत, विद्यार्थी, अनिवासी भारतीय यांच्याशी चर्चा करणार आहेत.
भारतात रोजगाराच्या संधी कमी असल्याबद्दल प्रिन्स्टन विद्यापिठातील अध्यापक सोंधी यांनी विचारल्यावर राहुल यांनी जितकी गरज आहे तितक्या प्रमाणात भारत सरकार रोजगार उपलब्ध करु शकलेले नाही असे उत्तर दिले. रोजगार नसणे हा भारतासाठी मोठा अडथळा होऊन बसला आहे दररोज ३०,००० मुले बेरोजगार बाहेर येतात मात्र ४०० ते ५०० नोकर्याच उपलब्ध असतात. भारताला या संकटातून बाहेर यावे लागेल. राहुल यांनी मोदींच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडियावरही टीका केली. मेक इन इंडीयामध्ये लघू उद्योग वाढणे अपेक्षित होते मात्र त्याचा फायदा केवळ मोठ्या उद्योगांना होत असल्याचे मत गांधी यांना मांडले . यांत्रिकीकरण व संगणकाने रोजगार जातो याबाबत विचारले असता तो म्हणाले, १९९० साली संगणक आल्यावर रोजगार जाईल अशी चर्चा होत असे. आताही चालकाविना गाडीमिळे नोकर्या जातील असो म्हणतात पण त्याने नवे रोजगार येतील असंही मी एेकलंय. यांत्रिकीकरणाने रोजगार जात नाहीत तर रोजगाराचं स्वरुप बदलतं असं मला वाटतं.
भारताच्या राजकीय व्यवस्थेचा केंद्रीकरण हा एक मोठा दोष आहे. राजकीय विकेंद्रीकरण फार महत्त्वाचे आहे असे राहुल यांनी भारतातील सध्याच्या राजकीय व्यवस्थेबाबत बोलताना सांगितले. भारताच्या विकासात अनिवासी भारतायांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.