अमेठीत मोदींनी खोटारडेपणा केल्याचा राहुल गांधींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:19 AM2019-03-05T06:19:55+5:302019-03-05T06:20:09+5:30
अमेठी येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीचा पायाभरणी समारंभ आपल्या हस्ते २०0७ साली झाला होता
नवी दिल्ली : अमेठी येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीचा पायाभरणी समारंभ आपल्या हस्ते २०0७ साली झाला होता आणि तिथे अनेक वर्षांपासून छोट्या शस्त्रांचे उत्पादन होत आहे, पण हा प्रकल्प जणू काही आपणच आणला या थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा खोटे बोलले आहेत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.
एके-२०३ रायफलींच्या उत्पादनासाठी भारत व रशिया यांच्या संयुक्त सहकार्याने अमेठीतील कोरवा येथे बांधण्यात येणाऱ्या कारखान्यासह ५३८ कोटी रुपये खर्चाच्या १७ योजनांचा पायाभरणी तसेच लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, अमेठीतील आॅर्डिनन्स फॅक्टरीमध्ये गेल्या काही वर्षांपासून छोट्या शस्त्रांचे उत्पादन करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेठीमध्ये जाऊन पुन्हा खोटे बोलले. सतत खोटारडेपणा करण्याची तुम्हाला लाज वाटत नाही का. असा सवालही राहुल गांधी यांनी मोदींना विचारला आहे.
अमेठी येथील आॅर्डिनन्स फॅक्टरीकडे राहुल गांधी यांनी साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. या कारखान्यात बनणाऱ्या एके-२०३ रायफली आता ‘मेड इन अमेठी' म्हणून ओळखल्या जातील असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यावर राहुल गांधी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राहुल घाबरले
- स्मृती इराणी
राहुल गांधी यांच्या टष्ट्वीटवर तात्काळ प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, अमेठीमध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे राहुल गांधी घाबरले आहेत. रायफलींच्या उत्पादनांसाठी अमेठीत उभारला जाणाºया कारखान्याचा प्रकल्प त्यांनी नजरेआड केला होता.
>२०0७ : राहुल गांधी यांनी अमेठीत आॅर्डिनन्स फॅक्टरीचे उद्घाटन केले होते. तेथे काही वर्षांपासून छोट्या शस्त्रांचे उत्पादन करण्यात येत आहे.
>२०१९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेठीत जाऊन रविवारी पुन्हा आॅर्डिनन्स फॅक्टरीचे उद्घाटन केले. त्यावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे.