'त्या' ट्विटवरून भाजपाच्या मंत्र्याने काढली राहुल गांधींची अक्कल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 03:44 PM2018-03-22T15:44:50+5:302018-03-22T15:47:24+5:30
भाजपा आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत
नवी दिल्ली - फेसबुक डेटा लीकप्रकरण आणि इसिसमध्ये ३९ भारतीयांची झालेल्या हत्येवरुन राहुल गांधी यांनी ट्विट करत भाजपावर टीका केली होती. राहुल गांधी यांच्या ट्विटला उत्तर देताना भाजपाच्या मंत्र्याने राहुल गांधीची अक्कल काढली आहे.
इसिसमध्ये ३९ भारतीयांची हत्येवरुन लोकांचे लक्ष विचलित व्हावे म्हणून भाजपाने फेसबुक डेटा लीक प्रकरण समोर आणलं असल्याचे ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. यावर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी राहुल गांधीच्या समजुतदारपणावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, राहुल गांधी यांची अक्कल पायत आहे का? एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, राहुल गांधी यांची अक्कल पायत आहे का? त्यांनी विचार करायला हवा. डेटाचोरी सारखा गंभीर आपराध निरपराध भारतीयांसोबत जोडला आहे. जर डेटा चोरीमध्ये जे लोक असतील त्यांना सर्वांसमोर आणलं गेलं पाहिजे.
Rahul Gandhi Ji akal se bilkul paidal hain kya? He should think over it, a grave crime of innocent Indians' data theft is being committed & if people involved in this are being exposed, he has a problem?: MA Naqvi on Rahul Gandhi's tweet pic.twitter.com/WDCi0xs1Wq
— ANI (@ANI) March 22, 2018
काय म्हणाले होते राहुल -
राहुल गांधींनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, इराकमध्ये 39 भारतीयांच्या झालेल्या हत्येवरून लक्ष विचलित करण्यासाठीच फेसबुकच्या डेटा लीकची गोष्ट समोर आणली गेली आहे. इराकमध्ये 39 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. सरकारचा खोटेपणा उघड झाल्यानं ते अडचणीत सापडले आहेत. सरकारनं यातून स्वतःचा बचाव करायचा असल्यानं काँग्रेसचा फेसबुक डेटा लीक प्रकरणात हात असल्याचा आरोप केला आहे.
Problem: 39 Indians dead; Govt on the mat, caught lying.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 22, 2018
Solution: Invent story on Congress & Data Theft.
Result: Media networks bite bait; 39 Indians vanish from radar.
Problem solved.
काय आहे डेटा चोरी प्रकरण -
2013 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठामधील रिसर्चर अलेक्झांडर कोगनने पर्सनॅलिटी क्विझ अॅप तयार केला. या अॅपचा जवळपास 3 लाख लोकांनी वापर केला. त्यांनी स्वतःची तसेच मित्रांची खासगी माहिती या अॅपवर शेअर केली. 2014 मध्ये फेसबुकने धोरणात बदल केला. आता कोगनच्या अॅपवर मित्रांची माहिती शेअर करता येणार नव्हती. यासाठी मित्राकडेही ते अॅप असणे बंधनकारक झाले. 2015 मध्ये कोगनने या अॅपद्वारे मिळालेली माहिती 'केम्ब्रिज अॅनालिटिका'ला दिल्याचे समोर आले. हा प्रकार नियमांचं उल्लंघन करणारा होता यानंतर आम्ही तातडीने कोगनच्या अॅपवर बंदी आणण्यात आली. तसेच कोगन आणि केम्ब्रिज अॅनालिटिकानेही त्यांना मिळालेला डेटा डिलीट करावा, अशी सूचना केली. त्यांनी डेटा डिलीट केला नाही, हे गेल्या आठवड्यात समोर आल्यानंतर आम्ही केम्ब्रिज अॅनालिटिकावरही बंदी घातली, असे त्यांनी सांगितले.
मार्क झुकेरबर्गने केली चूक मान्य -
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी डेटा चोरीप्रकरणी फेसबुकवर एक पोस्ट लिहीत मौन सोडलं होतं. डेटा चोरी प्रकरणात कंपनीकडून आतापर्यंत अनेक पावलं उचलण्यात आली आहेत आणि यापुढेही कठोर पावलं उचलली जातील. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, असे आश्वासन देत झुकेरबर्ग यांनी केम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणात झालेली आपली चूक मान्य केली आहे. झुकेरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं आमची जबाबदारी आहे. जर आम्ही यामध्ये अपयशी ठरत असू तर ही आमची चूक आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्ही अनेक पाऊलं उचलली होती, आमच्याकडून अनेक चुकाही झाल्या आहेत. या चुका सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मी फेसबुकचा संस्थापक आहे, त्यामुळे फेसबुक संबंधित कोणतीही चुकीची गोष्ट होत असेल तर त्यास मी जबाबदार आहे. झालेल्या प्रकरणांतून आम्ही आमच्या चुका जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहू आणि पुन्हा तुमचा विश्वास संपादीत करू.
भाजपाने काय केले आरोप
- बातम्यांचा हवाला देत रवी शंकर यांनी दावा केला की, काँग्रेस केम्ब्रिज अॅनालिटिकाची सेवा घेत आहे. याबद्दल त्यांनी काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्तीच केली.
- निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस असला अनुचित मार्ग पत्करणार का?
राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटर चाहत्यांची संख्या अचानक वाढल्याचा उल्लेखही त्यांनी केला. लोकप्रियता मिळविण्यासाठी असल्या मार्गाचा वापर करणार का?
- काँग्रेसने आजवर अशा अनुचित मार्गाने किती भारतीयांची माहिती मिळविली?
याचा खुलासा करावा. गुजरात आणि ईशान्य भारतातील अलीकडच्या निवडणुकीनंतर कर्नाटक विधानसभेच्या आगामी निवडणुकीतही काँग्रेस या कंपनीची सेवा घेणार का? हेही स्पष्ट करावे.
भाजपानेच घेतली मदत
भाजपाच्या या हल्ल्यानंतर काँग्रेसनेही भाजपावर पलटवार केला. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला म्हणाले, केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीशी आमचे काहीही देणेघेणे नाही. किंबहुना भाजपा आणि जेडीयूचाच या कंपनीशी संबंध आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपाने ‘मिशन -२७२’ तसेच हरियाणा, झारखंड, महाराष्टÑ आणि दिल्लीत कंपनीची सेवा घेतली
दरम्यान, भाजपा आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी लोकांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या आरोपामुळे फेसबुक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.