'चौकीदार ही चोर' क्राईम थ्रिलर सुरू, लोकशाही रडत असल्याची राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 09:30 AM2018-11-20T09:30:55+5:302018-11-20T09:32:45+5:30
सीबीआयमधील अलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील वादात आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि एका मंत्र्याचे नाव घेण्यात आले आहे
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. दिल्लीत 'चौकीदार ही चोर' नावाने एक गुन्हे मालिका सुरू असून त्यामध्ये सीबीआय, एनएसए यांच्या भूमिका असल्याचं राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत अधिकारी थकले असून देशातील लोकशाही रडताना दिसत असल्याचं राहुल यांनी म्हटले आहे.
'चौकीदार ही चोर' नावाने दिल्लीत सुरू असलेल्या क्राईम थ्रिलरच्या नवीन भागात सीबीआयच्या डीआयजींद्वारे एक मंत्री, एनएसए, कायदा सचिव आणि कॅबिनेट सचिव यांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष्य केलं आहे. अधिकारी थकले आहेत, विश्वास तुटला आहे अन् लोकशाही रडत आहे, असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
सीबीआयमधील अलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील वादात आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि एका मंत्र्याचे नाव घेण्यात आले आहे. सीबीआयमधील डीआयजी रँकचे अधिकारी मनिषकुमार सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करुन आपल्या नागपूर बदलीला कोर्टात आव्हान दिलं आहे. तसेच एका याचिकेद्वारे त्यांनी मोदी सरकारमधील कोळसामंत्री हरिभाई पार्थीभाई पटेल यांच्यावर कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. मोईन कुरैशी प्रकरणात पटेल यांनी ही लाच घेतल्याचा आरोप सिन्हा यांनी केला आहे. हरिभाई पटेल हे गुजरातचे खासदार असून अहमदाबादमधील विपुल नामक व्यक्तीकडून त्यांनी ही लाच घेतल्याचे सिन्हा यांनी सांगितले. तर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे मोईल कुरैशीप्रकरणात अटक असलेले आरोपी मनोज प्रसाद आणि सोमेश प्रसाद यांच्याशी जवळचे संबंध असल्याचेही सिन्हा यांनी आपल्या याचिकेतील अर्जात म्हटले आहे.
दिल्ली में 'चौकीदार ही चोर' नामक एक क्राइम थ्रिलर चल रहा है|
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 20, 2018
नए एपिसोड में CBI के DIG द्वारा एक मंत्री, NSA, कानून सचिव और कैबिनेट सचिव के खिलाफ गंभीर आरोप हैं।
वहीं गुजरात से लाया उसका साथी करोड़ों वसूली उठा रहा है|
अफ़सर थक गए हैं| भरोसे टूट गए हैं| लोकतंत्र रो रहा है| https://t.co/Tng5uu6m5q