राहुल गांधींची चीन भेट...हे तर "भक्तां"चं षडयंत्र - काँग्रेस
By admin | Published: July 10, 2017 02:36 PM2017-07-10T14:36:34+5:302017-07-10T14:58:51+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनचे भारतातील राजदूत लुओ झुओई यांची भेट घेतल्याच्या वृत्ताचं काँग्रेसकडून खंडन करण्यात आलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनचे भारतातील राजदूत लुओ झुओई यांची भेट घेतल्याच्या वृत्ताचं काँग्रेसकडून खंडन करण्यात आलं आहे. शनिवारी राहुल गांधींनी लुओ झुओई यांच्या भेट घेतल्याच्या बातम्या येत होत्या. काँग्रेसनेही हे वृत्त खोटं असल्याचं सांगत अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे दिल्लीमधील चीनी दुतावासाने यासंबंधी आपल्या वेबसाईटवर (http://in.china-embassy.org) टाकलेलं स्टेटमेंट नंतर डिलीट करुन टाकल्याचं वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे.
आणखी वाचा
राहुल गांधी यांनी लुओ झुओई यांची भेट घेत सध्या भारत आणि चीनमध्ये डोकलामवरुन सुरु असलेल्या वादावर चर्चा केल्याचं सांगण्यात येत होतं. काँग्रेसने मात्र ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेस यासंबंधी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
A wanting to be "Bhakt" channel will not question 3 Union Ministers visiting China or PM"s bonhomie & praise at G20 yet run fake news!
— Randeep S Surjewala (@rssurjewala) July 10, 2017
Before MEA & IB sources plant news with "Bhakts", they should reverify that we still have diplomatic relations with all our neighbours.2/n
— Randeep S Surjewala (@rssurjewala) July 10, 2017
काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्टिवरच्या माध्यमातून आरोप केला आहे की, "काही न्यूज चॅनेल्स राहुल गांधी आणि लुओ झुओई यांच्यात भेट झाल्याच्या खोट्या बातम्या चालवत आहेत". या बातम्या परराष्ट्र मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणांकडून पेरण्यात आल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख राम्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी20 परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांच्यासोबत झालेल्या भेटीत सीमारेषेचा मुद्दा का उपस्थित केला नाही यावरुन आश्चर्य व्यक्त केलं होतं. इतकंच नाही तर राहुल गांधी जर चीनी राजदूताला भेटले असतील तर त्यात मला काही वादासारखं दिसत नाही असंही त्या बोलल्या होत्या.
Will "Bhakts" look at this news too? Or do they promise, based on plants, that "conversation is dead"? 3/n https://t.co/pU320sC1Oc
— Randeep S Surjewala (@rssurjewala) July 10, 2017
राहुल गांधीनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गट करत चीनच्या मुद्यावर शांत का ? असा सवाल विचारला होता. याआधी बुधवारीही राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा दुबळे पंतप्रधान म्हणून उल्लेख केला होता. एच-1बी व्हिसा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल आणि अमेरिकेने ‘भारत प्रशासित काश्मीर’ असा उल्लेख केला असताना त्याचा विरोध न केल्याबद्दल राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दुबळे पंतप्रधान संबोधले होते. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे वक्तव्य केलं होतं.