नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संकटामुळे बंद करण्यात आलेली रेल्वे सेवा आता हळूहळू पुन्हा रुळावर येत आहे. रेल्वे सेवा सुरू होताच प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मात्र, पुन्हा कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे लोकांची चिंता आणखी वाढली आहे. (rail passengers are requested to read the health advisory guidelines issued by different states before journey)
याच पार्श्वभूमीवर ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याचा सल्ला भारतीय रेल्वेकडून लोकांना देण्यात येत आहे. आता सोमवारी रेल्वे मंत्रालयाने एका ट्विट करत कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेने काय म्हटले आहे?कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना विनंती आहे की, प्रवासापूर्वी विविध राज्यांनी दिलेल्या आरोग्य सल्लागार मार्गदर्शक तत्त्वे वाचा, असे रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाचा नवीन स्ट्रेन देशातील बर्याच राज्यांत आढळल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता बर्याच राज्यांत पुन्हा कोरोनाचे नियम कडक करण्यात आले आहेत. तसेच, नाईट कर्फ्यू लागू केला आहे. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेण्यात येत आहे.
अलीकडे, पूर्व मध्य रेल्वेने दिल्ली-मुंबई ते बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सल्ला जारी केला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, मुंबई किंवा देशातील इतर राज्यांतून बिहारला येत आहेत. त्यांनी फक्त थर्मल स्कॅनिंगच करायची नाही तर या सर्व प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रवासापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची बाब...ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी प्रवासी ज्या राज्यात जात आहेत, त्या राज्यातील मार्गदर्शक तत्त्वे वाचून पाहिली पाहिजेत, असे ट्विटमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. यावेळी प्रत्येक राज्यात राज्य सरकारकडून वेगवेगळ्या मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. काही राज्यात प्रवेशासाठी RT-PCR निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट दाखविणे बंधनकारक केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोरोनासोबत सर्वांनी मिळून लढण्यासाठी असे करण्यात आले आहे.