रेल्वेच्या किचनमध्ये कसं तयार होतं जेवण; आता प्रवाशांना दिसणार LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 11:07 AM2018-07-05T11:07:47+5:302018-07-05T11:08:07+5:30

रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थ्यांच्या जेवणाच्या दर्जाबद्दल कायम साशंकता असते

Railway Passengers will able to see kitchen irctc kitchen live | रेल्वेच्या किचनमध्ये कसं तयार होतं जेवण; आता प्रवाशांना दिसणार LIVE

रेल्वेच्या किचनमध्ये कसं तयार होतं जेवण; आता प्रवाशांना दिसणार LIVE

googlenewsNext

नवी दिल्ली: रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल प्रवाशांच्या मनात कायम साशंकता असते. रेल्वेत मिळणारं जेवण कसं तयार केलं जातं, ते तयार करताना स्वच्छता राखली जाते का, असे अनेक प्रश्न प्रवाशांच्या मनात असतात. त्यामुळे बहुतांश प्रवासी रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थ टाळतात. त्यामुळे आता आयआरसीटीसीनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आयआरसीटीसीनं लाईव्ह स्ट्रिमिंग मॅकेनिजम विकसित केलं आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये दिलं जाणारं जेवण नेमकं कसं तयार केलं जाते आहे, हे प्रवाशांना पाहता येणार आहे. 

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत याबद्दलची सूचना केली होती. यानंतर काल रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी काल आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील लाईव्ह स्ट्रिमिंग सेवेचं उद्घाटन केलं. यामुळे आयआरसीटीसीकडून तयार केल्या जाणाऱ्या जेवणाचं किचनमधून लाईव्ह स्ट्रिमिंग होईल. आपल्याला मिळणारं जेवण कसं तयार केलं जातं, ते तयार करताना आसपास स्वच्छता असते का, हे पाहणं यामुळे प्रवाशांना शक्य होईल. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील गॅलरी सेक्शनमध्ये या व्हिडीओंची लिंक शेयर केली जाईल. यामुळे खाद्यपदार्थ नेमके कसे तयार केले गेले, हे प्रवाशांना अगदी सहज पाहता येईल. 

काही दिवसांपूर्वीच आयआरसीटीसीनं नवीन वेबसाईट सुरू केली. या माध्यमातून प्रवाशांच्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न रेल्वेनं केला आहे. प्रवाशांना अनेक गोष्टी सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशानं ही नवी वेबसाईट तयार करण्यात आली. लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधा सुरू करण्यापूर्वी अश्विनी लोहानी यांनी आयआरसीटीसीच्या नोएडातील एका किचनची पाहाणी केली होती. या किचनमधून राजधानीच्या 17 गाड्यांसह शताब्दी आणि दुरांतो गाड्यांना खाद्यपदार्थ पुरवले जातात. 
 

Web Title: Railway Passengers will able to see kitchen irctc kitchen live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.