रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेलवे (SECR) मध्ये काही पदांवर भरती काढण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. योग्य व इच्छुक उमेदवार 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अधिकृत सूचनेनुसार 26 पदांवर भरतीसाठी स्पोर्ट कोट्यातून उमेदवार निवडले जाणार आहेत.
भरतीसाठी शैक्षणिक योग्यता...गैर तांत्रिक पदांसाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे. तसेच काही पदांसाठी दहावी पास होण्यासोबतच आयटीआय होणेही बंधनकारक आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. मात्र, त्यांना तीन वर्षांचे ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे. कोणत्याही विषयात पदवी मिळविलेले उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी 18 वर्ष ते 25 वर्षे अशी वयाची अट ठेवण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांचा पगार हा 5200-20200 रुपये प्रति महिना असणार आहे.
अर्ज शुल्क सामान्य वर्गासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर एससी, एसटी उमेदवार आणि महिलांसाठी 250 रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क ऑनलाईनही भरता येणार आहे.
निवड कशी होणार...उमेदवारांनी ज्या खेळांमध्ये प्राविण्य मिळविले आहे त्या खेळांची चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच त्याने जोडलेल्या स्पर्धांची सर्टिफिकिट पाहून, पडताळून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा....अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा...
लोकसभा सचिवालयात नोकरीची संधी; 12 वी ते एमबीए, 90000 पगारLok Sabha Secretariat Recruitment 2021: लोकसभा सचिवालयामध्ये विविध जागांवर भरती निघाली आहे. या भरतीमध्ये हेड कन्सल्टंट, सोशल मीडिया मार्केटिंग (सीनियर कन्सल्टंट), सोशल मीडिया (ज्युनियर कन्सल्टंट), ग्राफिक डिझायनर, सीनियर कंटेंट रायटर (हिंदी), ज्युनिअर कंटेंट रायटर (हिंदी) आणि सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनिअर असोसिएट) आदी 9 पदांवर भरती करण्यात येणार आहे.
Lok Sabha Consultant Recruitment: पदांची संख्या...हेड कन्सल्टंट - 01सोशल मीडिया मार्केटिंग - 01सोशल मीडिया - 01ग्राफिक डिझायनर - 01सीनियर कंटेंट रायटर - 01ज्युनिअर कंटेंट रायटर - 01सोशल मीडिया मार्केटिंग - 03
शिक्षणाची अट...लोकसभा सचिवालयात या भरतीसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. य़ामध्ये 12 वी पास ते ग्रॅज्युएट आणि एमबीएपर्यंत शिक्षण लागणार आहे.
Government Job: पैसे छापायचेत? केंद्राच्या टांकसाळीत नोकरीची सुवर्णसंधी; पदवी, आयटीआयधारक हवेतकेंद्र सरकारची मिनी रत्न कंपनी म्हणजेच टांकसाळमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. कोलकाता येथील टांकसाळीमध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठी जाहिरातही काढण्यात आली आहे. इंडियन गव्हर्नमेंट मिंटद्वारे १७ जानेवारीला जाहिरात (सं. IGMK/HR (Estt.)/Rect./01/2020) प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशिअन आणि अन्यसाठी एकूण 54 पदांसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आयजीएम-एसपीएमसीआयएलच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन igmkolkata.spmcil.com अर्ज करायचा आहे. अर्जाची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 20 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर शेवटची मुदत ही 19 फेब्रुवारी असणार आहे. अर्ज आणि जाहिरातीच्या आवश्यक लिंक खाली देण्यात आल्या आहेत.