Railway Recruitment : रेल्वेमध्ये परीक्षेविना होतेय १००४ पदांची भरती, दहावी पास उमेदवारांना संधी
By बाळकृष्ण परब | Published: January 5, 2021 02:02 PM2021-01-05T14:02:55+5:302021-01-05T14:07:04+5:30
RRC Apprentice Recruitment: भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२१ असून, rrchubli.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात.
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या सुमारे १००४ पदांसाठी ही भरती निघाली असून, दहावी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२१ असून, rrchubli.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे. इच्छुक उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावीमध्ये किमान ५०० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा, त्याशिवाय संबंधित ट्रेडमधील आयटीआयचा डिप्लोमा असणे आवश्य आहे.
दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या एकूण १००४ पदांची भरती होणार आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या विभागातील अप्रँटिसच्या पदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. यामध्ये हुबळी २८७, कॅरिएज रिपेअर वर्कशॉप हुबळी २१७, बंगळुरू डिव्हिजन २८०, म्हैसूर डिव्हिजन २८०, म्हैसूर डिव्हिजन १७७, सेंट्रल वर्कशॉप, म्हैसूर ४३ अशी पदे भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी २४ वर्षे एवढी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी यांच्याशाठी १०० रुपये एवढे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. तर आरक्षित वर्ग आणि महिलांसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांची निवड परीक्षेशिवाय होणार आहे. ही निवडण शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर होईल.