संतापजनक! ...अन् शेतकऱ्याच्या पोटावर अधिकाऱ्याने मारली लाथ; धक्कादायक Video जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 08:35 AM2021-07-17T08:35:07+5:302021-07-17T08:37:04+5:30

SDM kick to farmer who demand compensation in bharat mala project : शेतकऱ्यासोबत अधिकाराने धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्याला लाथ मारली आहे.

rajasthan jalaur sdm kick to farmer who demand compensation in bharat mala project | संतापजनक! ...अन् शेतकऱ्याच्या पोटावर अधिकाऱ्याने मारली लाथ; धक्कादायक Video जोरदार व्हायरल

संतापजनक! ...अन् शेतकऱ्याच्या पोटावर अधिकाऱ्याने मारली लाथ; धक्कादायक Video जोरदार व्हायरल

Next

नवी दिल्ली - राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सांचौर भागात एका शेतकऱ्यासोबत अधिकाराने धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्याला लाथ मारली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. प्रतापपुरा गावात भारत माला प्रकल्पाअंतर्गत तयार होणाऱ्या हायवेअंतर्गत मोबदल्यासाठी शेतकऱ्य़ांनी तेथील बांधकाम काम थांबवलं होतं. यावेळी सांचोर एसडीएमने शेतकऱ्यांना लाथ मारली. एसडीएम भूपेंद्र यादव हे नरसिंगराम चौधरी या शेतकऱ्याला लाथ मारली आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

संतप्त झालेले शेतकरी आणि पोलीस यांच्यातही या घटनेनंतर झटापट झालेली पाहायला मिळाली. खूप प्रयत्नांनंतर पोलिसांनी संतप्त झालेल्या गावकऱ्यांना शांत केलं आहे. शेतकरी हे  भारत माला प्रोजेक्ट (Bharat Mala Project) अंतर्गत मोबादल्याची मागणी करत होते. अमृतनगर येथून जामनगरच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वेचं काम हे गुरुवारी सुरू झालं आहे. याच दरम्यान काही गावकरी तेथे जमले आणि त्यांनी हे काम थांबवलं. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. एसडीएमने गावकऱ्यांवरच मारहाणीचा आरोप केला आहे. 

शेतकऱ्यांनी माझ्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. त्यामुळेच मला स्वत:चा बचाव करण्यासाठी लाथ मारावी लागली असं म्हटलं आहे. सांचौर पोलीस ठाण्यात राजकीय कामात अडथळा आणला म्हणून शेतकऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेतकऱ्याला लाथ मारल्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून सर्वच जण या घटनेचा निषेध करत आहेत. तसेच संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आपल्या गावात याबाबत एक मीटिंग देखील घेतली आहे. 

एसडीएमने लाथ मारल्यानंतर हा वाद आणखी वाढला. दोन्ही बाजुंनी धक्काबुक्की आणि मारहाण सुरू झाली. पोलिसांनी खुप प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती थोडी शांत झाली आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये डीएलसी रेटवरून जोरदार वाद सुरू आहे. दोन वर्षांपासून उच्च न्यायालयात ही केस आहे. कोरोनामुळे अद्याप यावर सुनावणी झालेली नाही. तर दुसरीकडे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कंपनी आपलं काम थांबवण्यासाठी तयार होत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी काम थांबवलं. तेव्हा एसडीएम आणि शेतकऱ्यांमधील वाद उफाळून आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: rajasthan jalaur sdm kick to farmer who demand compensation in bharat mala project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.