14 वर्षीय 'जलपरी'चा विक्रम! 9 तासांत पार केलं 47 कि.मीचे अंतर  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 10:02 AM2018-02-07T10:02:36+5:302018-02-07T10:04:12+5:30

14 वर्षीय जलतरणपटूने जुहू बीचपासून ते गेटवे ऑफ इंडिया हे 47 किलोमीटर समुद्रातील अंतर पोहून पार केले.

rajasthan-swimmer-set-to-create-another-record | 14 वर्षीय 'जलपरी'चा विक्रम! 9 तासांत पार केलं 47 कि.मीचे अंतर  

14 वर्षीय 'जलपरी'चा विक्रम! 9 तासांत पार केलं 47 कि.मीचे अंतर  

Next

मुंबई - राजस्थानच्या एका 14 वर्षीय मुलीनं सलग 47 तास पोहत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राजस्थानमधील उदयपूरस्थित 14 वर्षीय गौरवी सिंघवी या जलतरणपटूने जुहू बीचपासून ते गेटवे ऑफ इंडिया हे 47 किलोमीटर समुद्रातील अंतर पोहून पार केले. मंगळवारी पहाटे 3.30 वाजता तिने पोहायला सुरुवात केल्यानंतर गेटवेला ती दुपारी 1: 32 वाजता पोहोचली. हे 47 किलोमीटरचे अंतर नऊ तास आणि 23 मिनीटांमध्ये यशस्वीरीत्या तिने पार करत विक्रम प्रस्थापित केला.

जुहू ते गेटवे हे अंतर आजवर कोणत्याही जलतरणपटूने पोहून पार केलेले नाही. गेटवे ऑफ इंडियाला गौरवीचे आगमन झाल्यावर उपस्थितांनी तिचे अभिनंदन करून तिला प्रोत्साहन दिले. यावेळी गेटवे ऑफ इंडियाला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थित राहून तिचे स्वागत केले. तर, या विक्रमात आई-वडील, आजी, प्रशिक्षक यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे गौरवीने सांगितले. 

गौरवी सिंघवीच्या या रेकॉर्डचे साक्षीदार होण्यासाठी कोस्ट गार्डच्या टीमसह कोच महेश पालीवाल आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते.  समुद्रा खवळला असतानाही गौरवीनं हा मोठा पल्ला सहजासहजी पार केला.  यावेळी गौरवीच्या सुरक्षेसाठी लाइफगार्ड आणि दोन बोटी तयार होत्या. गेल्यावर्षी मार्च महिन्यात गौरवीनं बांद्रा-वर्ळी सी-लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे 36 किमीचे अंतर पार केलं होतं.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गौरवीनं पोहायला सुरुवात केली होती. गौरवीच्या आई(शुभ सिंघवी )तिला सुरुवातीला ट्रेनिंग दिले होतं.  
उदयपूरातील फतहसागर तलावामध्ये गौरवी दरदोज 8 ते 10 तास पोहण्याचा सराव करत असे. सराव करताना ती नाश्ता करने किंवा पाणी पिणे हे सर्व ती पाण्यातच करत असे.

पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, देशातील खुल्या समुद्रातील सर्वांत जास्त अंतर गौरवीने पार केले आहे. हा जागतिक विक्रम म्हणायला हरकत नाही. तिने हा विक्रम 9तासांत केला आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांतर्फे तिच्या अभिनंदनासाठी आलो होतो, हे त्यांनी आवर्जून नमूद केले. आपल्या देशातल्या शालेय मुलीने विक्रम प्रस्थापित केल्याचा अभिमान असल्याचेही ते या वेळी म्हणाले. 

Web Title: rajasthan-swimmer-set-to-create-another-record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.