सी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:17 AM2019-01-24T04:17:10+5:302019-01-24T04:17:20+5:30

‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया’ने गेल्या नोव्हेंबरमध्ये नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमांनुसार घेतलेल्या सी. ए. फायनल परीक्षांमध्ये संपूर्ण देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा मान सिद्धांत भंडारी व शादाब हुसैन या राजस्थानच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला.

Rajasthan's theory of CA exams, first in the country of Shadab | सी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला

सी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला

Next

नवी दिल्ली: ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया’ने गेल्या नोव्हेंबरमध्ये नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमांनुसार घेतलेल्या सी. ए. फायनल परीक्षांमध्ये संपूर्ण देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा मान सिद्धांत भंडारी व शादाब हुसैन या राजस्थानच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला. सिद्धांत जोधपूरचा असून त्याने ८०० पैकी ५५५ (६९.३८ टक्के) गुण मिळविले. शादाब हुसैन हा कोटा येथील एका२२ शिंप्याचा मुलगा असून त्याला ८०० पैकी ५९७ (७४.६३ टक्के) गुण मिळाले. दोघांनीही दोन्ही गटांतील सर्व आठही विषयांची परीक्षा एकदम देऊन पहिल्याच प्रयत्नांत हे धवल यश संपादित केले.
नव्या अभ्यासक्रमात कोडे, गुजरात येथील शाहीद हुसैन शोकत मेमन (७३ टक्के) व पुरूलिया, प. बंगाल येथील ऋषभ शर्मा (७१.८८ टक्के) गुणवत्ता यादीत देशात अनुक्रमे दुसरे व तिसरे आले. जुन्या अभ्यासक्रमात दुसरा गुणवत्ता क्रमांक रोहित कुमार सोनी याने ६८ टक्के गुणांसह मिळविला.
तिसरा गुणवत्ता क्रमांक अहमदाबाद, गुजरात येथील पुलकित अरोरा व कोलकाता, प. बंगाल येथील जय बोहरा यांना प्रत्येकी ६७.६३
टक्के गुणांसह मिळाला. या दोन्ही परीक्षांच्या निकालानंतर देशात एकूण १४,९९६ नवे सी.ए. तयार झाले. नव्या अभ्यासक्रमाच्या दोन्ही गटांची स्वतंत्रपणे किंवा एकत्र परीक्षा एकूण १३,५६३ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ३,२८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ज्या १,०६० जणांनी दोन्ही गटांमध्ये उत्तीर्णता मिळविली ते सीए म्हणून अंतिमत: पात्र ठरले. जुन्या अभ्यासक्रमात एकूण ९०,८०२ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी २७,७४८ विद्याथी एका किंवा दोन्ही गटांमध्ये उत्तीर्ण झाले. ज्यांना दोन्ही गटांमध्ये उत्तीर्णता मिळाली असे १३,९०९ विद्यार्थी सी.ए. म्हणून पात्र ठरले.
प्रियांशी व दिशा नागपुरात ‘टॉप’
नागपूरच्या प्रियांशी जैन व दिशा बतरा (जुना अभ्यासक्रम) यांनी अखिल भारतीय पातळीवर १५ वा क्रमांक पटकावला. चिराग बतरा (नवीन अभ्यासक्रम) याने १७ वा तर राहुल आहुजा याने ४९ वा क्रमांक पटकावला.
‘फाऊंडेशन’मध्ये वैष्णवी तिवारी देशात ३३ वी
‘सीए फाऊंडेशन’च्या परीक्षेत वैष्णवी तिवारी हिने अखिल भारतीय पातळीवर ३३ वा क्रमांक मिळविला आहे. आकाश साहू याने ४२ वा क्रमांक पटकावला आहे. याशिवाय आदर्श अग्रवाल, सम्यक मोदी, यश दलाल, राजवीरसिंह भाटिया, अमन अग्रवाल, संस्कर अग्रवाल, कौशल टिबरेवाल यांनीदेखील ‘सीए फाऊंडेशन’च्या परीक्षेत उत्तम गुण मिळवले. वृत्त लिहिपर्यंत ‘सीपीटी’मध्ये श्रेय चांडक याने पहिले स्थान पटकाविल्याची माहिती मिळाली तर आतिशय बाकलिवाल दुसऱ्या क्रमांकावर असण्याची शक्यता आहे.
>जळगावची सौम्या सीपीटीमध्ये तिसरी
या दोन्ही अंतिम परीक्षांसोबतच गेल्या नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये घेतलेल्या आयपीसीसी व सीपीटी या दोन्ही परीक्षांचे निकालही जाहीर झाले. त्यापैकी सीपीटी या सीएच्या प्रवेश परीक्षेत जळगावच्या सौम्या गिरीराज जाजू या विद्यार्थिनीने ४०० पैकी ३६८ (९२ टक्के) गुणांसह संपूर्ण देशात तिसरा गुणवत्ता क्रमांक मिळविला.
>आॅडिटर बनण्याची इच्छा
फायनान्स क्षेत्राची आवड सुरुवातीपासूनच होती. सीएची परीक्षा देत असताना त्याचा अभ्यास सांभाळून मी शिपिंग कंपनीमधील इंटरनल आॅडिटचे कामही करत होते. देशात ४० वा क्रमांक येईल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र, यश मिळण्याची खात्री होती.
- पूजा यादव भोर, अंबरनाथ (ठाणे)

Web Title: Rajasthan's theory of CA exams, first in the country of Shadab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.