Rajya Sabha Deputy Chairman Election: एनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 12:00 PM2018-08-09T12:00:40+5:302018-08-09T12:31:00+5:30

हरिवंश नारायण सिंह यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन

rajya sabha deputy chairman election nda candidate harivansh narayan singh wins | Rajya Sabha Deputy Chairman Election: एनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव

Rajya Sabha Deputy Chairman Election: एनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव

Next

नवी दिल्ली: राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एनडीएच्या हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे. संयुक्त जनता दलाचे राज्यसभेचे खासदार असलेल्या हरिवंश सिंह यांनी काँग्रेसचे उमेदवार हरिप्रसाद यांचा पराभव केला. हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली, तर हरिप्रसाद 105 मतं मिळवण्यात यश आलं. यावेळी एकूण 222 खासदारांनी मतदान केलं. राज्यसभेचे सभापती असलेल्या व्यंकय्या नायडूंनी हरिवंश सिंह विजयी झाल्याची घोषणा केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरिवंश यांच्या खुर्चीजवळ जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही हरिवंश सिंह यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. 




राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूक जिंकण्याइतकं संख्याबळ नव्हतं. आज सकाळी भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं हरिवंश सिंह यांना 129 मतं मिळतील, असा विश्वास व्यक्त केला होता. राज्यसभेत एकूण 244 खासदार असून उपसभापतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 123 मतांची आवश्यकता होती. भाजपाकडे सकाळपर्यंत 121 मतं होती, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र तरीही अंतिम टप्प्यात भाजपाला काही पक्षांनी पाठिंबा दिल्यानं हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली. 




राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी दोनवेळा मतदान झालं. पहिल्या मतदानात हरिवंश यांना 115 मतं मिळाली. पहिल्या मतदानावेळी काही मतांची नोंद झाली नव्हती. त्यामुळे दुसऱ्यांदा मतदान घेण्यात आलं. यात हरिवंश यांना 122 मतं मिळाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आवाहन केल्यानं ओडिशातील बिजू जनता दल, तमिळनाडूतील अण्णा द्रमुक, तेलंगणातील टीआरएस या पक्षांनी हरिवंश यांना मतदान केलं. त्यामुळे काँग्रेसच्या आशा-अपेक्षांना सुरुंग लागला. 


Web Title: rajya sabha deputy chairman election nda candidate harivansh narayan singh wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.